वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने फुंकले जनआंदोलनाचे रणशिंग मोदी सरकारच्या शेतकरी मजूर व सामान्य जनता विरोधी धोरणांचा कडाडून विरोध

अमरावती ३० जुलै : आज केंद्र सरकारच्या शेतकरी , कष्टकरी व सामान्य जनता विरोधी धोरणामुळे अख्खा देश महागाईच्या आगीत होरपळून निघत आहे. दैनंदिन गरजेच्या जीवनावश्यक वस्तूवर जिएसटी लावण्यात आल्याने सामान्य जनतेचे जगणे असह्य झाले असून आता जनतेच्या मनामध्ये प्रचंड आक्रोश उफाळला आहे. संविधानाने दिलेली लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवून केंद्रातील मोदी सरकारने देशात दडपशाही चालविली असून या विरोधात आता
जनआंदोलन झालेच पाहिजे, याची सुरवात प्रायोगिक तत्वावर अमरावती मधून झाली असून जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या मोदी सरकार विरुद्ध सर्वानी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष , प्रवक्ता तथा विभागीय समन्वयक संजय खोडके यांनी केले . देशात वाढत्या प्रचंड महागाई व जीएसटी विरुद्ध अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शनिवार दिनांक ३० जुलै रोजी राजकमल चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संजय खोडके आपल्या अध्यक्षीय संबोधनात बोलत होते . पुढे बोलतांना संजय खोडके यांनी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार वर सडेतोड टीका केली . वर्ष २००४ ते २०१४ पर्यंतच्या युपीए सरकारने जनतेच्या कल्याणाची धोरणे आखली . अन्न सुरक्षा कायद्यामुळे आज कुणी भुकेने मरत नाही ,अशी स्थिती निर्माण झाली . तर तत्कालीन कृषिमंत्री शरद चंद्रजी पवार यांनी कृषी क्षेत्र समृद्ध केल्याने आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत मोठा निर्यातदार देश बनला. तत्कालीन युपीए सरकारकडे चांगले धोरण असल्याने अनेक प्रश्न सुटले , मात्र आता या विपरीत स्थिती देशात निर्माण झाल्याने जनतेचे जगणे असह्य झाले आहे. मोदी सरकारने घेतलेले निर्णय हे सामान्य जनता विरोधी असून ते केवळ भांडवलदार वर्गाचे हीत जोपासत असल्याचे शरसंधान राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांनी सोडले . तर सद्या विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मजुरांच्या हाताला काम त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली . मात्र राज्यातील नवीन शिंदे- फडणवीस सरकारचे शेतकरी हिताचा कोणताच निर्णय घेतला नाही. सरकार शेतकऱ्यांच्या व्यथांना घेऊन संवेदशील नसल्याचे यावरून दिसून येते . तर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा विरोधी पक्ष नेता अजितदादा पवार हे विदर्भ ,मराठवाडासह राज्याच्या दौऱ्यावर निघाले असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देत त्यांच्या पाठीशी उभे आहेत . अशा असंवेदनशील सरकारला वठणीवर आणण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आंदोलनाचा बिगुल फुंगला असून जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष , प्रवक्ता तथा विभागीय समन्वयक संजय खोडके यांनी दिला .
यावेळी मोदी सरकार विरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली . महागाईचा राजा कोण .. मोदी शिवाय आहेच कोण, वापस दो… वापस दो .. बुरे दिन वापस दो.. अशा घोषणाबाजीने मोदी सरकारच्या धोरणांचा विरोध करण्यात आला .
दरम्यान महागाई व जीएसटी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राजकमल चौकात निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आली . लोकशाही मार्गाने आंदोलन असून असतांना पोलिसांनी आंदोलन उधळून लावले व शेकडो आंदोलनकर्त्यांना डिटेन केले .यावेळी राष्ट्रवादी कडून सरकारच्या दडपशाहीच्या धोरणाचा निषेध करण्यात आला .
ही मोदी विरोधात एल्गाराची सुरुवात -प्रशांत डवरे
आज देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहे. भारतीय संविधानांना अभिप्रेत राहून देश चालत आला आहे. मात्र गेल्या १० वर्षाच्या मोदी सरकारच्या काळात घटनेच्या कलमांची पायमल्ली होत असल्याने मोदींनी देश डबघाईस आणला आहे. नोटबंदी , जीएसटी सारख्या निर्णयाने सामान्य जनतेला वेठीस धरले असून जीवनावश्यक वस्तूवर लावलेल्या जीएसटी मुळे जनता आता महागाईने भरडली जात आहे. ब्रिटिश सरकारच्या काळात ज्या तऱ्हेने मिठावर कर लावल्याने महात्मा गांधी यांनी इंग्रजांविरुद्ध दांडी यात्रा काढून जनआंदोलन छेडले व इंग्रजांना पळवून लावले , आता त्याच तऱ्हेने जनता मोदीसरकार विरुद्ध पेटून उठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महागाई विरुद्ध आंदोलन छेडून मोदी विरुद्ध एल्गार पुकारला असल्याचे मनोगत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे यांनी व्यक्त केले .
भाजपने चालविली लोकशाहीची पायमल्ली – ऍड. किशोर शेळके
मोदी सरकार बहुमतात असतांना त्यांनी जनकल्याणाचे धोरण राबवायला हवे .मात्र त्यांनी घटनेतील कायद्यांची पायमल्ली करून लोकशाहीचा चुराडा केला आहे. भांडवलदारांचे हीत संबंध जोपासणाऱ्या भाजपा सरकारने अनेक शासकीय यंत्रणांचा गैरफायदा घेऊन सूडबुद्धीने राजकारण केले . अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची गळचेपी केली . मोदी सरकार संविधानाला मानत नसल्याने आता संविधान वाचविण्यासाठी व लोकशाही जिवंत ठेवून मोदींची दडपशाही हाणून पाडण्यासाठी आज संविधानिक मार्गाने लढा उभारण्याची गरज असल्याचे मनोगत माजी महापौर ऍड . किशोर शेळके यांनी व्यक्त केले .
जनतेचे दुःख व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन – डॉ . गणेश खारकर
देशवासीयांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या काळात सामान्य जनतेला बुरे दिन अनुभवास मिळत आहे. देशात प्रचंड महागाई वाढली असल्याने जनतेचे जगणे असह्य झाले आहे. पेट्रोल -डिझेलची भरमसाठ दरवाढ झाल्याने वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकारला गरिबाला मारायचं आहे. व मोठे उद्योजक , धनदांडग्यांना अधिक मोठं करायचं आहे. महागाईत जनता भरडली जात असून सरकार मात्र उदासीन आहे. त्यामुळे हे रयतेचे राज्य नसून देशात दडपशाही सुरु झाली आहे. महागाई विरोधात जनता टाहो फोडत असून जनतेची हाक व दुःख व्यक्त करण्यासाठीच राष्ट्रवादीचे आंदोलन असल्याची भूमिका डॉ . गणेश खारकर यांनी व्यक्त केली .
गृहिणीचे बजेट कोलमडले – छाया मिश्रा
देशात महागाईचा भस्मासूर आ वासून पाहत असून पेट्रोल नंतर घरगुती गॅस व आता जीवनावश्यक वस्तूवर जिएसटी लावण्यात आल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. दूध व दही वर सुद्धा जिएसटी लावण्यात आल्याने सरकार सामान्य जनतेच्या तोंडचा घास हिसकावून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणत असल्याची सडेतोड टीका ऍड . छायाताई मिश्रा यांनी केली
रासायनिक खतांवर १८ टक्के जिएसटी – प्रा . सुशील गावंडे
केंद्र सरकारने रासायनिक खतांवर १८% जीएसटी लावला असल्याने रासायनिक खतांच्या किमती दीड पटीने वाढविल्या आहेत . तसेच खतांवरील सबसिडी काढून टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांवर प्रचंड आर्थिक भार पडत आहे. खतावरील खर्च हा मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शेतीतील उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे आता शेती करणेही कठीण झाले असल्याने या सरकारने शेतकरी व मजुरांनाही तंग करून सोडले आहे.अतिवृष्टीचा झळ सोसणाऱ्या शेतकऱ्यांप्रती सुद्धा मोदी सरकार संवेदनशील नसल्याची नाही . अशा शब्दात प्रा . सुशील गावंडे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला .
यूपीए काळात आंदोलन करणारे रामदेव बाबा गेले कुठे- प्रा .डॉ. अजय बोन्डे*
मोदी सरकारच्या काळात महागाईने कळस गाठला आहे. तत्कालीन युपीए सरकारच्या काळात पेट्रोल , घरगुती गॅस चे असलेले सामान्य दर आज तिप्पट वाढले आहे. यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल दरवाढी विरुद्ध आंदोलन करणारे रामदेवबाबा मोदी सरकारच्या काळात कुठे गेले. मोदींवर बांगड्या फेकणाऱ्या स्मृती ईराणी महागाईवरून गप्प का असा सवाल प्रा .डॉ . अजय बोन्डे यांनी यावेळी उपस्थित केला .
*राष्ट्रवादीच्या महागाई विरोधी आंदोलनात शेकडोंचा सहभाग *
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधिमंडळ समन्वयक व विभागीय समन्वयक-संजय खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, माजी महापौर ऍड. किशोर शेळके, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश मार्डीकर, माजी नगरसेवक रतन डेंडूले, लकी नंदा, भूषण बनसोड, प्रवीण मेश्राम, प्रशांत महल्ले, जयश्री मोरे, सपना ठाकूर, मंजुश्री महल्ले, विजय बाभुळकर, ममता आवारे, के. एम. अहमद, अब्दुल सत्तार राराणी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी डॉ. गणेश खारकर, प्रा. डॉ. हेमंत देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सुशील गावंडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश हिवसे, निलेश शर्मा, अशोक हजारे, गजानन बर्डे, सुनील रायटे, संजय बोबडे, दिनेश देशमुख, पप्पूशेठ खत्री, ऍड. सुनील बोळे, प्रमोद सांगोले, दीपक कोरपे, मनीष देशमुख, मनोज केवले, राजाभाऊ चौधरी, जितेंद्रसिंह ठाकूर, किशोर भुयार, किशोर देशमुख, प्रा. डॉ. अजय बोन्डे, भोजराज काळे, प्रमोद महल्ले, योगेश सवई, प्रशांत पेठे, बंडू निंभोरकर, आकाश वडनेरकर, सुयोग तायडे, प्रवीण भोरे, श्रीकांत झंवर, आनंद मिश्रा, संजय मळणकर, संदीप आवारे, प्रवीण आकोडे, शुभम पारोदे, शक्ती तिडके, जयकुमार नागे, रत्नदीप बागडे, महेंद्र सोमवंशी, राजेंद्र कुर्हेकर, सागर इंगळे, बाबुरावजी वानखडे, रवी भैसे, सतीश चरपे, देविदास जांभुळकर, दीपक ठाकूर, प्रदीप सहारे, आकाश राऊत, रामकृष्ण जांभुळकर, नरेंद्र राऊत, धर्मपाल जांभुळकर, उमेश चौधरी, गंगाधर सहारे, ओंकारराव बंड, लक्ष्मण चाफळकर, शाहू चौधरी, निलेश नागापुरे, वैभव तिडके, राजेश बर्वे, बाळा नागे, सतीश रोंघे, महादेवराव नरोडे, संजय कुकरेजा, अभिषेक हजारे, गंगाधर सहारे, सचिन रहाटे, अंकुश बोधनकर, रवी पटके, देविदास जांभुळकर, अमोल वानखडे, पंजाब मुकवाने, श्यामलाल यादव, युवराज कोचे, प्रवीण कदम, प्रतापराव देशमुख, सीताराम यादव, दिलीप शिरभाते, अशोकराव जाधव, आशिष कपले, नरेंद्र राऊत, संजीव कथिलकर, राजेंद्र चिंचमलातपुरे, दिलीप वऱ्हाडे, दीपक जुनघरे, सदानंद घरडे, लकी फुले, अक्षय पळसकर, पंकज गोबरे, संजय महाजन, वैभव देशमुख, राजू सांगोले, मनोज गावंडे, त्र्यंबक सांगोले, विशाल भगत, सचिन दळवी, छोटू खंडारे, उमेश जगताप, बबलू ढोरे, गजानन तायडे, अक्षय बुरघाटे, जितू तायडे, महादेव मोहोड, अनंत पारिसे, प्रशांत चऱ्हाटे, सुरेश चौधरी, बबन चव्हाण, सुरेश कव्हाने, अमोल कपले, राजू घेबड, अरविंद चव्हाण, राजाभाऊ चौधरी, सतीश देशमुख, डॉ. राजेंद्र दाळू, श्रेयश पेठे, यश रहाटे, प्रतीक ढोकरे, अनिकेत मेश्राम, सौरभ भुम्बर, सुरज अढाळके, संकेत बोके, प्रणय हिवसे, प्रथमेश बोके, अंकित राजगुरे, अभिजित लोहिटे, अथर्व सावदे, भूषण गोसावी, मनीष पाटील, सागर इंगळे, मनीष पेठे, संदीप औशीकर, प्रभुदास फंदे, नितीन उर्फ छोटू खंडाळकर, सुरेश चव्हाण, प्रमोद इंगळे, नरेंद्र वानखडे, स्मित माथुरकर, पवन सांगोले, विजय ओझा, अन्नू उर्फ मलिक, भाष्कर ढेवले, शिवाजी चौधरी, प्रा. संजय शिरभाते, अब्दुल सत्तार, नईमभाई चुडीवाले, सामी पठाण, सय्यद साबीर, सादिक रजा, सनाउल्ला सर, आदिल शेख, फिरोज शाह, मोईन खान, सद्दाम भाई, फारुखभाई मंडपवाले, बबलूभाई, राजीक पटेल, नासिर हुसेन, सलीम मास्टर, अबरार भाई (गॅरेंटेड), मोहम्मद शफी शेख रसूल, नसीम खा पठाण, अख्तरभाई फोरोग्राफर,मुख्तार अहंमद, डॉ . करीम शाह , अयुब खान, समी उल्लाह पठाण, फिरोज अहमद, वहिद शाह, नासिर हुसेन, हाजी अख्तर हुसेन, सय्यद जुबेर हुसेन, मतीन टेलर, कीर्ती कोरडे, मीनल सवई, छबूताई मातकर, अंजली चौधरी, संजीवनी देशमुख, सारिका महल्ले, लीना डवरे, स्वाती गावंडे, ऍड. छाया मिश्रा, वैशाली गोंडाणे, पल्लवी खांडे, सपना तिडके, प्रणाली तिडके, दीपाली सोनोने, मालता झाडादे, संगीता मोरे, शांता बाभुळकर, छाया गायकवाड, संगीता गायकवाड, कल्पना जगताप, सुजाता गायकवाड, सुमित्रा पांडे, प्रमिला राऊत, शिल्पा चौधरी, चित्रा राऊत, सुनीता पांडे, गीता अडाईके, प्रतिभा गायकवाड, पुष्पा निचड, राजकन्या वानखडे, लक्ष्मी चांदणे, ज्योती गवई, सुशीला वानखडे, राजकन्या हिवराळे, सुषमा खडसे, कल्याणी गायकवाड, वर्षा कदम, नंदा कांबळे, प्रियंका शेंडे, ए. जी. देशमुख, शोभा हिवसे, बेबी राऊत, रेखा इंगोले, सुदेशनी मळणकर, छाया कथिलकर, कांचन देशमुख, संगीता पाटील, आदींसहित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व फ्रंट चे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *