तडीपार आरोपी ची शहरात हातात चाकू घेऊन पसरवीत होता दहशत… फ्रेजलपुरा पोलिसांनी आरोपीस केली अटक…

अमरावती पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या फ्रेजलपुरा पोलीस ठाण्याहद्दीतील संजय गांधी नगर नं 1 येथे तडीपार आरोपी अमन बाबाराव देवळेकर वय 26 वर्ष रा. यशोदा नगर हा युवक तडीपार असल्यावर सुद्धा शहरात येऊन स्थानिक संजय गांधी नगर नं 1 येथील परिसरात हातात चाकू घेऊन रस्त्यावर ये-जा करणाऱ्या स्थानिक नागरिक यांना मध्य रस्त्यावर थांबवून चाकूचा धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण करत आहेत. अशी गुप्त माहिती फ्रेजलपुरा पोलिसांना मिळताच त्यांनी फ्रेजलपुरा पोलिस स्टेशन चे ठाणेदार अनिल कुरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथक पो.उप.नि. गजानन राजमलू, पो.हे.कॉ. योगेश श्रीवास,ना.पो.कॉ. हरीश बुंदेले, श्रीकांत खडसे, पो.कॉ.धनराज ठाकूर,अनुप झगडे यांनी शिताफीने आरोपी अमन बाबाराव देवळेकर याला पकडून अटक केली आहे. तर त्याचेवर भादवी कलम क 4,25 शस्त्र अधिनियम सहकलम 135,142 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *