वाशीम । मारुती राऊत यांच्या पुण्यतिथी निमित्त वसंत विद्यालय पोहा येथील विद्यार्थ्यांना गणवेश वितरण आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

युवकांना पुस्तकी ज्ञान सोबत व्यवहारिक ज्ञान असणे खूप गरजेचे – आशिष धोंगडे

वाशिम | आज दि.29/8/2022 रोजी वसंत विद्यालय पोहा येथे मारुती राऊत यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.महाविद्यालयातील युवकांना गणवेश वितरण करण्यात आले आणि गुणगौरव विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन वसंत विद्यालय पोवा आणि विश्वनाथजी राऊत व राऊत परिवाराकडून या कार्यक्रमाचे आयोजन यांच्या माध्यमातून करण्यात आली होती.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.एकनाथ इंगळे हे होते. मार्गदर्शक म्हणून आशिष धोंगडे (अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक), प्रमुख उपस्थिती कमलपाल गाटे महाराज (सत्य खंजिरी वादक), बंडू भाऊ इंगोले (बहुजन पत्रकार संघटना जिल्हाध्यक्ष), उल्हास ठाकरे (पत्रकार), विश्वनाथजी राऊत या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते. युवकांना पुस्तकी ज्ञान सोबत व्यवहारिक ज्ञान असणे खूप गरजेचे आहे व स्वतः कलागुणांना वाव देणे आणि नेतृत्व कुणाकडे युवकांनी वाटचाल करावी यासंदर्भामध्ये मार्गदर्शक म्हणून लाभलेले आशिष धोंगडे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील युवकांना गणवेश वितरण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमांमध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक आणि महाविद्यालयातील शिक्षक वृंद मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.कार्यक्रमाला विद्यालय येथील युवक व युवतींचा मोठ्या प्रमाणे सहभाग होता अशा प्रकारे मा.मारुती राऊत यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *