Amravati | ३० वर्षीय युवकावर चाकू हल्ला, जुन्या वादावरून हल्ला

अमरावती शहरांमध्ये रोजच्या दिवसाला क्राइम वाढत असल्यामुळे आता चक्क दिवसाढवळ्याच चाकू हल्ले होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एक असाच प्रकार फ्रेजरपूरा पोलीस स्टेशन मध्ये घडला होता, ज्यात धक्क्याच्या वादावरून चाकू हल्ला करण्यात आला होता. तो चाकू सुद्धा चक्क पाठीत आत मध्ये अडकला होता, तर आता नागपुरी गेट व गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये द्वारका नगर चौकात सोमवारी दुपारी जुन्या वादावरून चाकू पोटामध्ये खुपसण्यात आला. तर आरोपीने पहिला वार हा पोटामध्ये केला असता दुसरा वार करण्याकरिता पोटामधून चाकू काढण्यात गेला तर चाकू हा पोटामध्ये अडकला व चाकूची मूठ आरोपीच्या हातामध्ये आली, अशा वेळेस फिर्यादी हा गंभीर जखमी असून त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आणण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ फिर्यादीला ओटीमध्ये घेऊन ऑपरेशन करून चाकू त्वरित बाहेर काढण्यात यश आले. फिर्यादी गंभीर जखमी असून त्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहे तर या प्रकरणातील आरोपीला नागपुरी गेट पोलिसांनी अटक करून गाडगे नगर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पुढील तपास गाडगे नगर पोलीस स्टेशन करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *