अमरावती । शिक्षकांवरील हल्ल्याचा अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे निषेध

पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

गत आठवड्यात २४ ॲागस्ट रोजी श्री. गणेशदास राठी विद्यालय अमरावती येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर, विद्यार्थीनींची छेडखानी करणाऱ्या काही समाज कंटकांनी हल्ला चढवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. व पर्यवेक्षकांना मारहाण करून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे संपूर्ण शालेय प्रशासन तथा विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भविष्यात अमरावती शहरातील शाळेमध्ये अशा दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकरीता समस्त शाळेतील मख्याध्यापकांनी अमरावती जिल्हा व महानगर मुख्याध्यापक संघाच्या नेतृत्वांतर्गत सदर्हू घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. मंगळवार दि. ३० ॲागस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता गणेशदास राठी विद्यालय, अमरावती येथे जिल्हा मुख्याध्यापक संघांतर्गत सर्व मुख्याध्यापक एकत्र आलेत व येथून अमरावती शहर पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक, शिक्षण उपसंचालक तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदने देण्यात आलेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके, तसेच अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष प्रशांत डवरे, राज्य शिक्षक संघ अध्यक्ष दिलिप कडू यांच्यासह जिल्ह्यातील व महानगर मुख्याध्यापक मोठ्या संख्येत उपस्थित होते, अशा घटनांना अंकुश लावण्यासाठी प्रभावी पाऊले उचलण्यात यावी अशी मागणी सुद्धा निवेदनातून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *