धानोरा मोगल ते सावंगी रोडवर दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू, रोड पूर्णपणे खराब असल्याने अपघात झाला असल्याचा स्थानिकांचा सूर

चांदुर रेल्वे तालुक्यातील धानोरा मोगल ते सावंगी रोड पूर्णपणे खराब असल्या कारणाने या रोडवर सतत अपघात होत असल्याची बाब पुन्हा समोर आली आहे. ३० ऑगस्ट च्या रात्री १०.३० च्या दरम्यान एका दुचाकीला अपघात झाला. दुचाकी क्रमांक MH-27-R-9611 या हिरो होंडा स्प्लेंडर गाडीचा अपघात झाल्याने त्यात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. मृतक व्यक्तीचे नाव धानोरा मोगल येथील रहिवासी रामदास अण्णाजी मरकाम ( वय अंदाजे ७२ ) हे असून ते रिटायर पोलीस कर्मचारी होते, अपघात घडला त्याठिकाणी ते रात्री १०.३० पासून घटनास्थळीच पडून होते.

रोडवरील गिट्टी पूर्णपणे वर आल्याकारणाने त्यांची गाडी घसरून पडली असावी असा कयास धरला जातोय. रामदास मरकाम यांच्या डोक्याला रस्त्यावरील दगडाचा मार लागल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येतंय. सकाळी रहदारी करणाऱ्या नागरिकांना अपघात घडल्याचं निदर्शनास आलं.

गेल्या दोन ते तीन वर्षापासून सदर रोड खराब असल्याच स्थानिकांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिलं मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज एका सामान्य व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला असं बोलल्या जातंय. आता तरी शासनाचे डोळे उघडावे व रस्त्याचे काम लवकरात लवकर करून द्यावे. अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

घटनास्थळी नांदगाव खंडेश्वर पोलीस व चांदुर रेल्वे पोलीस दाखल झाले होते, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *