अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील बेबी केअर सेंटरला आग प्रकरण, एका बालकाचा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

  • ६ नवजात बालकं सुपरमध्ये दाखल, २ पीडीएमसीत दाखल

जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या बेबी केअर सेंटर मध्ये रविवारी शॉट सर्किट मुळे आग लागली होती. अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात आणल्या नंतर येथील नवजात बालकांना सुपर स्पेशालिटी, पीडीएमसी व इर्विन मध्ये हलविण्यात आले. यातील ७ बालके सुपरमध्ये, तर २ बालके पीडीएमसी व १ बालक इर्विन मध्ये दाखल असतांना यातील सुपर मधील एक बालक दगावले असल्याची माहिती समोर आली आहे. बेबी केअर सेंटर मधील आगीमुळे दाटलेल्या धुरामुळे बालक गंभीर होऊन दगावले असल्याचे प्राथमिक कारण सांगण्यात येत आहे. तर अन्य बालके हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणी मध्ये असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *