अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आग प्रकरण नागपूर अग्निशमन विभाग करणार चौकशी

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील ( डफरीन हॉस्पीटल ) व्हेंटिलेटरच्या आगीची चौकशी समिती अंतिम निष्कर्षाप्रत न पोहचू शकल्याने सदर प्रस्तावित अहवालाला नवे वळण प्राप्त झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाची तटस्थपणे चौकशी म्हणजेच थर्ड पार्टी इन्व्हेस्टीगेशन केली जावी म्हणून जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी मंगळवारी नागपुरच्या शासकीय अग्निशमन महाविद्यालयाच्या चमूला पाचारण केले आहे. रविवारी लागलेल्या आगींमुळं रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची बरीच धांदल उडाली होती. एसएनसीयू वार्डातील तब्बल ३७ नवजात बालकांचे प्राण त्यामुळे धोक्यात आले होते. परंतु तेथे उपस्थित डॉक्टर्स व परिचारिकांनी. धावपळ करुन डॅमेज कंट्रोल केले. तरीही उशीरा सायंकाळी या नवजात शिशूंमधील एका बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे या अपघाताबद्दल लोकप्रतिनिधी व प्रशासन अधिक गंभीर झाले आहेत. आगीचे तपशील घेताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोवीस तासाच्या आत या प्रकरणाचा चौकशी अहवाल बोलावला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी लगेच सूत्रे हाती घेत चौकशी समिती गठित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *