अमरावतीत शिकस्त इमारत पडली, पाच जणांचा मृत्यू एक जखमी

अमरावती शहरातील प्रभात चित्रपटगृहा जवळील दुमजली शिकस्त इमारत दुपारी 1 च्या सुमारास कोसळली,यात पाच जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला मृता मध्ये चार मजूरासह एकाचा मृत्यु झाला चार जणांची यात ओळख पटली असून एकाची ओळख अद्यापही पटली नाही,अमरावती महापालिकेने चार वर्षांपूर्वीच व्यावसायिक दुकानें असलेली ती इमारत अतिशीकस्त म्हणून पडण्याचे निर्देश सबंधिताला दिले होते. तेथे ही इमारत अतिशीकस्त आहे असे फलक देखील लावण्यात आले होते.दरम्यान दोन तीन दिवसापासून ती इमारत पाडण्याचे काम सुरु होते मात्र पाडकाम सुरु असताना इमारतीचा पहिला माळा अचानक कोसळला.यात ही घटना आहे, घटनास्थळी जिल्हाधिकारी पवनीत कौर, खासदार अनिल बोंडे, आमदार सुलभा खोडके यांनी भेट दिले.

तीन जेसीपी, अग्निशमन वाहनांसह रुग्णवाहिका या बचावकार्यात सहभागी होत्या. विशेष म्हणजे ही इमारत जर्जर झालेली असून याठिकाणी असलेल्या राजेंद्र लॉज च्या मालकांना ही इमारत पाडण्याचा इशारा महानगरपालिकाने आधीच दिला होता .लॉज मालकाने ही इमारत न पाडता किंवा सुरक्षेची काळजी न घेता नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याचे यावेळी संतप्त नागरिक बोलत होते.

याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पणनीत कौर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *