शालेय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – सुलभाताई खोडके

  • आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी खेळाडू व क्रीडाप्रेमींना दर्शविला विश्वास
  • सरकार अमरावती हॉकी लीग स्पर्धेचा बक्षीस वितरणाने समारोप
  • शालिमार इंडियन्स व बाली टायगर्स संघाला संयुक्त विजेतेपद

अमरावती ३० ऑक्टोबर : सरकार ग्रुप अमरावतीच्या वतीने स्थानिक डिप्युटी ग्राउंड येथे २५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२२ पर्यंत आयोजित सरकार अमरावती हॉकी लीग स्पर्धेचा रविवारी आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते बक्षीस वितरणाने समारोप करण्यात आला . या स्पर्धेतील अंतिम सामना शालिमार इंडियन्स व बाली टायगर्स संघामध्ये खेळण्यात आला. निर्धारित कालावधी मध्ये दोन्ही संघांची कामगिरी सारखीच असल्याने पंचानी दोन्ही संघांना संयुक्तपणे विजयी घोषित केले. यावेळी आमदार महोदयांच्या हस्ते दोन्ही संघातील कर्णधारांना संयुक्तपणे ३६ हजाराचे पारितोषिक विभागून देत तसेच ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच वैयक्तिक पुरस्कारचे सुद्धा मान्यवर अतिथींच्या वतीने वितरण करण्यात आले. तत्पूर्वी सरकार ग्रुपच्या वतीने आ. सौ. सुलभाताई खोडके, यश खोडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत देखील करण्यात आले. या प्रसंगी मंचावर उर्दू एजुकेशन असोसिएशन अमरावतीचे अध्यक्ष जनाब आसिफ हुसैन , टूर्नामेंट सेक्रेटरी अफसर बेग सर, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष हाजी रफीकभाई , राष्ट्रवादी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष प्रा.सना उल्लाह खान सर, सना खान ठेकेदार, माजी नगरसेवक शेख हमीद शद्दा , तन्वीर आलम, गाजी जहरोश, आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रीडा स्पर्धांमधून राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सद्भावनेला बळकटी मिळते. अमरावतीच्या मातीतून राष्ट्रीय दर्जाचे हॉकी पटू तयार व्हावेत , यासाठी हॉकी स्पर्धेचे आयोजन प्रशंसनीय असून अमरावती क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत . दोन वर्षाच्या कोरोना काळामुळे शासन स्तरावर अनेक शालेय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन होऊ शकले नाही , दरम्यान खेळाडूंचा सराव सुरूच असल्याने त्यांचे क्रीडा कौशल्य वाढीस लागण्यासाठी आता विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन व्हावे यासाठी, शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी खेळाडू व क्रीडाप्रेमींपुढे व्यक्त केला . सरकार ग्रुपच्या वतीने आयोजित सरकार अमरावती हॉकी लीग मध्ये सहा संघ सहभागी झाले होते. ज्यामध्ये संघ मालक राजेश अग्रवाल यांनी अमरावती मंडळ टीम , अक्रम देशमुख यांनी बाबा अल्मास टीम , नौशाद खान यांनी शालिमार इंडियन्स , सिराज बाली यांनी बाली टायगर्स टीम , इमरान अशरफी यांनी शेर-ए-हिंद , तर संघमालक जाहिद खान यांनी संडे फॅशन असे हॉकीचे संघ या स्पर्धेत उतरविले होते . सहा दिवस चाललेल्या या स्पर्धेत अंतिम सामान्यांपर्यंत मजल मारणाऱ्या शालिमार इंडियन्स व बाली टायगर्स संघाला संयुक्त विजेतेपद बहाल करण्यात आले . तसेच सदरच्या यशस्वी आयोजनासाठी आ.सौ. सुलभाताई खोडके व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष , प्रवक्ता तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले असल्याची माहिती टूर्नामेंट सेक्रेटरी अफसर बेग सर यांनी दिली.

यावेळी हबिबभाई ठेकेदार, नदिमामुल्ला सर, मुख्तार भाई, वहिद शाह, हाजी अख्तर दिलबर शाह, साबिरभाई पहेलवान, मोईन खान, बबलू अंपायर, फारुकभाई मंडपवाले, सैय्यद साबीर,फहिम मेकॅनिक, सनी पठाण, अबरारभाई गॅरंटर, डॉ. अब्दुल रहीम पप्पू, अबरार मोहम्मद साबीर, अब्दुल नईम चुडीवाले, सादिक रजा, सादिकभाई आयडिया, अजमद पहेलवान, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, मनीष पाटील , संकेत बोके , जयेश सोनोने, अभिजित लोयटे , अदनान हुसेन आदींसह सरकार ग्रुपचे सभासद , हॉकी संघातील खेळाडू तसेच क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *