अमरावती | मॉर्निंग चषक 2022 चे थाटात उद्घाटन

  • प्रथम पारितोषिक 81 हजार एक, व्दितीय 41 हजार एक तर तृतीय 21 हजार एक
  • मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅस्टमन

अमरावती, दि. 15 : मॉर्निंग क्रिकेट क्लबमार्फत राबविण्यात येणाऱ्या क्रिकेट सामान्यासोबतच इतर क्रीडा स्पर्धांचे याठिकाणी आयोजन करण्यात यावे. अशा विविध स्पर्धांच्या आयोजनासाठी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेव्दारे सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी आज दिले.

शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 124 व्या जयंती उत्सवानिमित्त श्री. शिवाजी शिक्षण संस्था कर्मचारी व मॉर्निंग क्रिकेट कल्ब यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. वा. मो. उपाख्य दादासाहेब काळमेघ स्मृती प्रित्यर्थ मॉर्निंग चषक 2022 (टेनिस बॉल क्रिकेट सामने) च्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार सुलभाताई खोडके, श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, माजी महसूल उपायुक्त उध्वराव गरकल, मातोश्री विमलाबाई देशमुखमहाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिताताई देशमुख, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विलास ठाकरे, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण गावंडे, डॉ. पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतनेचे प्राचार्य डॉ. गजानन गोसावी, वैशाली बिजवे, श्रीरामजी भटकर, आजीवन सदस्य सदशिवराव चिंचे यांच्यासह क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

मॉर्निंग क्रिकेट क्लबमार्फत आयोजित क्रिकेट चषक सामान्यांची उत्तरोत्तर चांगली प्रगती होऊन यापेक्षाही मोठे बक्षीसे प्रदान होवो. अशाच पध्दतीचे क्रिकेट स्पर्धांचे राज्यस्तरावर आयोजन व्हावे, अशा शुभेच्छा आमदार सुलभाताई खोडके यांनी याप्रसंगी दिल्या.

क्रिकेट सामान्यांच्या यशस्वी आयोजनासाठी मॉर्निंग क्रिकेट क्लबचे दिनेश पांडे, विलास श्रीखंडे, महेंद्र जळीत, संदीप सगणे, दीपक वानखडे, नितीन खंडारकर, विजय गरकल, विजय राऊत, संजय सदावर्ते, दिलीप देशमुख, गुड्डू ढोरे, पिंटू देशमुख, जयंत पैकीने, प्रमोद बोरकर, रवी गणेशपुरे, संजय गुल्हाने, संजय घाणेकर, नितीन बनसोड, आशिष उघडे, राजा राऊत, अनिल क्षीरसागर, शैलेश शिरभाते, जगदीश पानसरे, मंगेश घुटे, श्याम देशमुख, सुशील ठवळी, अनिल पवार, निशांत निस्ताने, शैलेश ठाकूर, जितेंद्र विधाते, रणजीत डिक्कर, समीर सिंघम, शत्रुघन विघे, बालू भटकर, विशाल अढाऊ, श्रीकांत देशमुख, निलेश नाईक, प्रविण ठाकरे, राहुल कुचे, उमेश काळे, पराग गुल्हाणे, निलेश नवघरे, मनीष देऊळकर, मयूर ढेवले, मिलिंद पुंड, योगेश देशमुख, मनीष केचे, मनीष झिमटे, कुमार हरदुले, स्वप्नील तराळ, योगेश गावंडे, गजानन कळमकर, सुमित समर्थ, अनिकेत धोटे, अतिष टाले, नितीन वसू, प्रकाश पाटील, श्रीकांत नागपुरे, स्वप्नील मालवीय, स्वप्नील मोहोड, स्वरूप अढाऊ, राहुल गौरखेडे, बाबू चौधरी, कुशल जाधव, सुधांशू बुरघाटे, चेतन जिचकार, अविनाश बागडे, अभी बुरनासे, सुशील राऊत, अजिंक्य बोके, अमित भुसारी, शुभम देशमुख, शशांक उजैनकर, क्षितिज बोंडे, सनी तावरे, विपीन राहाटे, रजत गणवीर, अजिंक्य देशमुख, शंकर राजगुरू, माधव टेलगोटे, ऋषीकेश लांडगे, अभिजित थेरे, भूषण भांबुरकर, कुणाल तिवारी, मयूर शिरभाते, नितीन खांडे, सौरभ देशमुख, शिरीष अग्रवाल, विक्की उगवकर, कार्तिक भटकर, अमित शेळके,ऋषी नवघरे, मंगेश मिसाळ,प्रवीण तेलखडे, प्रशांत धर्माळे, विक्रम वसु, कैलास गव्हांदे, धनंजय मानकर, दिनेश धकाते, मयूर कदम, मंगेश खूपसे, कुशल जाधव, प्रणव इंगोले, अजिंक्य देशमुख, परिमल राऊत, निशाल भोंडे, मयूर लुटे, राहुल चौधरी, विशाल भारसाकळे, अखिलेश भांबुरकर, लोकेश डिंगोलिया, उमेश जयस्वाल, उमेश बावणेर, सुमंगल खत्री, वरूण देशमुख आदींनी मेहनत घेतली आहे. याप्रसंगी संचलन मंगेश मिसाळ यांनी केले तर आभार मिलिंद पुंड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *