कोरोनाचा संभाव्य धोका पाहता NMMC प्रशासन अलर्ट मोडवर; कोविड सेंटर पुन्हा सज्ज ठेवण्याचे आदेश

कोरोनाचा संभाव्य धोका पाहता नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडून सावधगिरीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार आता पालिका क्षेत्रात कोविड चाचण्या करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. यामध्ये रेल्वे स्टेशन, एपीएमसी मार्केट, बाजारपेठ या ठिकाणी कोरोना चाचण्या करण्यात येतील. तसेच नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. यासोबतच महानगरपालिकेचे कोविड सेंटर पुन्हा एकदा सज्ज ठवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या BF.7 या नव्या व्हेरिएंटने भारताची चिंता वाढवली आहे. याबाबत राज्यातही काळजी घेतली जात आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी कोरोनाच्या संभाव्य धोक्याबाबत राज्य सरकारची काय तयारी सुरु आहे याबाबत माहिती दिली आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी राज्याची तयारी किती? याबाबत आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, आपल्याकडे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहेत. रुग्णालयीन व्यवस्था नीट ठेवावी त्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पूर्ण यंत्रणा सज्ज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *