स्व.माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वाद विवाद स्पर्धेचे आयोजन

राजकीय हस्तक्षेपामुळे प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात आहे या विषयावर होणार स्पर्धा

अमरावती | स्व.माणिकराव घवळे स्मृती प्रतिष्ठान आणि श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही स्व.माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा बुधवार ४ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. यावर्षी राजकीय हस्तक्षेपामुळे प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात आहे या विषयावर ही स्पर्धा रंगणार आहे. ४ जानेवारी २०२३ रोजी श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथे डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात ही स्पर्धा संपन्न होईल. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १०.३० वाजता पार पाडेल.

या स्पर्धेचे फेसबुक, युट्यूब च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. स्पर्धेत विजेता संघाला स्व.माणिकराव घवळे स्मृती फिरता चषक प्रदान करण्यात येईल. विषयाच्या अनुकूल आणि प्रतिकूल बाजूस मते मांडणाऱ्या दोन स्पर्धाचा संघ स्पर्धेसाठी पात्र ठरेल. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्यास ७००१ हजार रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय ५००१ हजार रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक म्हणून ३००१ हजार रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच प्रोत्साहनपर पारितोषिक प्रथम २००१ हजार रोख सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र व द्वितीय १५०१ हजार रोख व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल. या स्पर्धेचे हे २१ वे वर्ष असून, राजकीय हस्तक्षेपामुळे प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात आहे या विषया वरती विविध स्तरावर विचारमंथन करण्यात येत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांना या विषयावर मत मांडण्याची संधी प्राप्त होणार आहे. ही स्पर्धा निःशुल्क असून अधिकाधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे,संयोजक प्रफुल्ल घवळे व आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *