जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित

अमरावती, दि. २७ : शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिकांनी मुख्यमंत्री कार्यालयाला द्यावयाचे निवेदन, पत्र या कक्षाकडे दाखल करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा करण्यासाठी जिल्हास्तरावर कक्ष कार्यान्वित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या कक्षामुळे नागरिकांच्या निवेदनांवर तत्काळ कार्यवाही होऊन, प्रशासनात लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता निर्माण होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजनभवनाच्या इमारतीत जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या बाजूला हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिकांनी मुख्यमंत्री कार्यालयाला द्यावयाची निवेदने या कक्षात दाखल करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *