माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा

आताची सर्वात मोठी बातमी. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई हायकोर्टाने सीबीआयची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाने 12 डिसेंबरला अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. पण त्याविरोधात सीबीआयने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली नाही. दुसरीकडे मुंबई हायकोर्टानं जामीनाला दिलेली वाढीव स्थगितीची मुदत आज संपली. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने सीबीआयला मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे.

जामिनाला सीबीआयने घेतला होता आक्षेप
मनी लॉड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. मात्र त्यांच्या जामिनावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आक्षेप घेतला होता. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने जामीन देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

अनिल देशमुख यांना न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाच्या आदेशाला दिलेली स्थगितीची मुदत 22 डिसेंबर रोजी संपत होती. त्यामुळे स्थगितीच्या निर्णयाला 3 जानेवारी 2023पर्यंत मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एक खंडपीठाने देशमुख यांना जामीन मंजूर केल्याने त्यांच्यासमोरच मंगळवारी सीबीआयने प्रकरण सादर केलं. तसंच देशमुख यांना जामीन मंजूर करण्याच्या निर्णयाला दिलेली स्थगितीची मुदत वाढवण्याची मागणी केली होती.

अनिल देशमुखांच्या घराबाहेर जल्लोष

अनिल देशमुख यांची उद्या सुटका होणार असल्यामुळे त्यांच्या घराबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केलाय. मोठ्या संख्येनं कार्यकर्त्ये अनिल देखमुख यांच्या नागपूरातील घराबाहेर जमले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करता कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनला सुरुवात केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *