तांत्रिक कारणामुळे शिक्षक, शिक्षकेतरांच्या वेतनांना विलंब होऊ नये – उपेंद्र पाटील

  • शालार्थ वेतन प्रणाली तीन दिवसापासून पडली बंद
  • शालार्थ वेतन प्रणाली तात्काळ सुरु करण्याची मागणी

मानोरा : मागील तीन दिवसापासून बंद पडलेली शालार्थ वेतन प्रणाली तात्काळ पूर्ववत सुरु करण्याची मागणी कायम वीणा अनुदानित शाळा कृती समिती चे अमरावती विभागीय संघटक उपेंद्र बाबाराव पाटील यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षण विभागाचे सचिव व शिक्षण आयुक्तांना पाठविले आहे. तांत्रिक कारणामुळे शिक्षक, शिक्षकेतरांच्या वेतनांना विलंब होऊ नये, यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शालार्थ वेतन प्रणाली सोमवार १९ डिसेंबर रोजी सायंकाळपासून बंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नगरपालिका शाळा, जिल्हा परिषद शाळा, खाजगी, प्राथमिक, अनुदानित शाळा, खाजगी माध्यमिक अनुदानित शाळा, खाजगी उच्च माध्यमिक शाळा मधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन अदा करणे शक्य होणार नाही. या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे वेतन शालार्थ प्रणाली मार्फत अदा केले जातात. परंतु शालार्थ वेतन प्रणाली तीन दिवसापासून बंद असल्यामुळे राज्यातील कोणतेही वेतन बिले जनरेट होत नाहीत किंवा वेतन बिले काढता येत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

वेतन बिले तयार करून ती कोषागार सादर करणे, बिले मंजूर करून घेणे आणि बँकांमध्ये निधी जाणे यात काही कालावधी जात असतो. शालार्थ प्रणाली बंद असल्याने डिसेंबर महिन्याचे वेतन लांबणार आहे. यासाठी तात्काळ शालार्थ वेतन प्रणाली सुरू करण्याची मागणी पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *