जिल्हा सामान्य रुग्णालयात गुन्हे गारांचा वावर रुग्णालयात महिला चोर सक्रीय पोलीस व रुग्णालय प्रशासन कधी देणार लक्ष

जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला चोर सक्रीय झाल्या असून बुधवारी सकाळी रुग्णालयात आलेल्या तिन महिलांच्या पर्स चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली . कोतवाली पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी सुरु केली आहे . जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवार आणि गुरुवारी रुग्णांना वैद्यकीय प्रमाणपत्र तर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्र दिले जाते . या तिन दिवशी रुग्णांची व प्रमाणपत्र घेण्याऱ्यांची गर्दी असते . त्यामुळे बाह्यरुग्ण विभागात संबंधितांना प्रथम स्वतःच्या नावाची १० रुपयाची पावती काढावी लागते . त्यासाठी खिडकीसमोर रुग्णांच्या रांगा लागतात आणि एकच गर्दी होते . गर्दीचा फायदा घेत काही महिला चेहऱ्याला ओढणी बांधून रांगेत लागतात आणि महिलांच्या पर्स उडवितात . बुधवारी सकाळी १० ते ११ च्या दरम्यान रांगेत लागलेल्या तिन महिलांच्या पर्स अनोळखी महिलांनी उडविल्या . त्यामुळे बाह्यरुग्ण विभागात एक गोंधळ उडाला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *