ध्येय निश्चित करून विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावे तुकारामजी टेकाळे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांचे मोलाचे मार्गदर्शन

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपले ध्येय निश्चित करून प्रामाणिकपणे प्रयत्न करीत पुढे गेल्यास निश्चित यश मिळेल. असा मोलाचा सल्ला अमरावती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री तुकारामजी टेकाळे साहेब यांनी स्वर्गीय दत्तात्रय पुसदकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या नांदुरा लष्करपूर येथे आयोजित विशेष शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना दिला.

नांदगाव पेठ येथील स्वर्गीय दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय विशेष शिबिर दत्त ग्राम नांदुरा लष्करपूर या गावी आयोजित करण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन माननीय श्री तुकारामजी टेकाळे साहेब यांच्या शुभहस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय श्री श्रीकृष्णजी बाळापुरे, सचिव स्वर्गीय दत्तात्रय पुसतकर शिक्षण संस्था अमरावती हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद अमरावतीचे माजी सदस्य नितीन भाऊ हटवार, संस्थेचे उपाध्यक्ष निदानभाऊ बारस्कर, सरपंच रघुनाथजी सावळे, हरीषजी मोरे ,नांदगाव पेठच्या ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे नांदुरा लष्करपूरचे ग्रामसचिव वर्षा रामटेके, मुख्याध्यापक श्रीकृष्णजी लांजेवार, बाळासाहेब खवळ, किशोर भिलकर, नंदू भाऊ खडसे , दिनेश भाऊ मोरे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. गोविंद तिरमनवार यांनी सदर शिबिराच्या आयोजनामागची भूमिका प्रस्ताविकातून विशद करीत शिबिरात आयोजित होणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. याप्रसंगी निदान भाऊ बारस्कर ,हरीशभाऊ मोरे ,नितीन भाऊ हटवार या मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर शिबिरात ग्रामस्वच्छता, महिला सक्षमीकरण, जलसंधारण, पर्यावरण संरक्षण या अनुषंगाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे सोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीनेही विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सात दिवसीय विशेष शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रमाधिकारी डॉक्टर सौ. सुनीता बाळापुरे यांनी तर आभार प्रदर्शन सहकार्यक्रम अधिकारी डॉक्टर सुभाष पवार यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *