THANE – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आपचे आंदोलन

सरकारी शाळांचा कायापालट करुन आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांची अटक म्हणजे इडी, सीबीआय द्वारे केंद्र सरकारने चालवलेली दडपशाही आहे त्याचा निषेध म्हणून आम आदमी पार्टी ठाणे जिल्हा तर्फे ठाणे येथे शासकीय विश्राम गृह बाहेर निषेध आंदोलन करण्यात आले.
येणाऱ्या काळामधे आम आदमी पार्टी हा मुख्य प्रति द्वन्द्वी म्हणून भारी पडेल , त्याकारणाने बीजेपी सुडाचे राजकारण करत आहे .
“दिल्लीत शिक्षण क्रांती घडवून आणण्यात आप नेते व शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांचा सिंहाचा वाटा आहे. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये घडलेले अभूतपूर्व बदल हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरलेला आहे. सरकारी शाळांचा कायापालट करुन आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना बदनाम करण्यासाठी भाजपच्या केंद्र सरकारने मोठी मोहीम चालवली आहे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ह्यांची ताकद कमी करण्याकरिता सरकारी यंत्रणाचा गैर वापर करून सुडाचे राजकारण करत करत आहे .
आरोग्य व शिक्षण क्षेत्रात आम आदमी पार्टीने केलेल्या कामांची दखल देशातील जनतेने घेतली असून केवळ दहा वर्षात आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारूपाला आला आहे. जनतेचा प्रचंड प्रतिसाद आम आदमी पार्टीला मिळत आहे. त्यामुळे भाजप चिंताग्रस्त झाला आहे. भाजपला आरोग्य, शिक्षण क्षेत्रात कधीच भरीव कामगिरी करता न आल्याने आकसाने आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील आरोग्य मंत्री, शिक्षण मंत्री व इतर नेत्यांवर सुडात्मक कारवाई केली जात आहे. त्यासाठी खोटे आरोप करुन इडी, सीबीआय यासारख्या यंत्रणांचा गैरवापर करत आपच्या नेत्यांना अटकेत टाकत आहे. मनीष सिसोदिया यांच्यावर लावलेले आरोप खोटे आहे . उद्योगपति गौतम अडानी ह्यानी लाखो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करून सुद्धा कुठलिहि कारवाई बीजेपी सरकारने केलि नाही , महाराष्ट्र चे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ह्यांच्यावर बैंक मधे हज़ारो कोटी रुपयांचा चा घोटाळा केल्याच्या आरोप असून सुधा कुठली ही कारवाई केली नाही . बीजेपी सरकार फक्त विपक्ष मधील लोकांवर कारवाई करत आहे .
अरविन्द केजरीवाल ह्यांनी महाराष्ट्र मधे येऊन श्री उद्धव ठाकरे ह्यांची भेट घेतली व त्यांची सांत्वना केलि त्याचा बदला म्हणून बीजेपी सरकारने ही अटक सुडबुद्धिने घडवून आणली आहे . केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात आम आदमी पार्टी संविधानिक मार्गाने जोरदार मोठ्या ताकदिने लढाई लढेल. असे आम आदमी पार्टी ठाणे युवा जिल्हा अध्यक्ष श्री अमर आमटे ह्यानी सांगितले .
ह्यावेळी , श्री मधुकर फरडे , सचिव ठाणे पालघर , सतीश सलूजा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष ,रमेश वर्मा कोपवेरमा कोपरी वि अध्यक्ष , प्रीति शिंदेकर नवी मुंबई उपाध्यक्ष , संतोष केदार नवी मुंबई युवा अध्यक्ष , संतोष कोरि ठाणे शहर सचिव , सुनील यादव , मुबारक अंसारी , सलीम मुनगे , जावेद पवार , कनक पांडेय , देवराम सूर्यवंशी , राजकुमार गुप्ता , तथा आदि कार्यकर्ता उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *