Wardha : शेतक-याकडून लाच घेतली, महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यावर गुन्हा दाखल

शेतामध्ये कॅनलवरुन ओलीतासाठी पाणी घेण्याकरिता लवकर वीज मीटर लावून देतो असे सांगून शेतकऱ्याकडून लाच घेतल्याने एसीबीने (acb) कनिष्ठ अभियंताला अटक केली. वासुदेव नागोराव पारसे (५८) असं अभियंताच नाव आहे.

तक्रारदार शेतकरी यांचे मौजा गौळ ता. देवळी येथे शेत आहे. त्यांच्या शेतात कॅनलवरुन ओलीतासाठी पाणी घेण्याकरिता शेतात वीज मिटर लावणे आवश्यक होते. मात्र, मीटर लावण्यासाठी लाचखोर कनिष्ठ अभियंता वासुदेव पारसे याने एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी शेतकऱ्याकडे केली. 

शेतकरी अभियंता वासुदेव पारसे याला अडेगाव येथील वीज वितरण केंद्रात लाचेची रक्कम देण्यासाठी गेला होता. शेतकऱ्याने एक हजार रुपयांची लाच अभियंत्याला दिली. अभियंत्याने लाचेची रक्कम स्विकारताच लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी त्यास रंगेहात पकडले.

कनिष्ठ अभियंता वासुदेव पारसे याने लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लाच रकमेची मागणी करुन लाच रक्कम स्विकारल्याने त्यास अटक करण्यात आली. याप्रकरणी देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *