NANDED – नांदेड महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या आशा वर्कर्संनी केले एकदिवसीय उपोषण

आशांचा प्रोत्साहन भत्ता बँक खात्यावर टाकण्यात यावा, ही मागणी घेऊन सीटू संलग्न आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या आशांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करून २३ तारखेपासून सुरु असलेल्या आंदोलनास पाठिंबा दिला.
आशांच्या मागण्या महापालिकेच्या आयुक्त आणि आरोग्य विभागाशी संबंधित असल्यामुळे अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम यांनी तातडीने दखल घेत आरोग्य अधिकारी डॉ.बिसेन व आरोग्य अभियानातील इतर जबाबदारांच्या उपस्थितीत आपल्या कक्षात बैठक बोलावून पुढील सर्व साधारण सभेत मंजूरी घेऊन पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
एक आठवड्या पासून सुरु असलेल्या आंदोलनामध्ये थोडा बदल करण्यात आला असून दि.२८ फेब्रुवारी पासून अमरण उपोषणा ऐवजी नव्याने पत्र देऊन साखळी उपोषण करण्याचा निर्णय माकप, सीटू व जनवादी महिला संघटनेने घेतला असून तसे रीतसर पत्र दि.28रोजी प्रशासनास देण्यात येईल. तसेच एक मार्च रोजी तिसरे आंदोलन सुरु करीत असल्याचे सीटूचे राज्य सचिव कॉ. उज्वला पडलवार यांनी घोषित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *