यशोमंगल ले-आऊट येथील श्रीशिवसाई मंदिरात रामनवमीचा पर्व साजरा

चैत्र शुक्ल नवमी ३० मार्च रोजी श्री रामनवमी निमित्य व्हिएमव्ही-नवसारी मार्ग परिसर स्थित यशोमंगल ले-आऊट येथील श्री शिव-साई मंदिर येथे आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते श्री साईबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन-माल्यार्पण व आरती करण्यात आली. यावेळी श्री शिवसाई मंदिर व्यवस्थापन च्या वतीने रामनवमी चे औचित्य साधून खासकरून महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान शिवसाई मंदिर व्यवस्थापन समिती चे वतीने आमदार-सौ. सुलभाताई खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष-प्रशांत डवरे,यश खोडके यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.रामनवमी आणि गुरुपुष्यामृत साधून आलेला गुरुवार आशा त्रिवेणी योगावर यावेळी भावीकभक्त यांनी श्रींचे दर्शनार्थ एकाच गर्दी केल्याचे दृश्य यावेळी दिसून आले.यादरम्यान आमदार-सौ. सुलभाताई संजय खोडके व यश खोडके यांनी श्रींचे चरणी नतमस्तक होऊन विश्व कल्याणाची प्रार्थना केली. यावेळी आमदार-सौ. सुलभाताई खोडके यांनी सर्व उपस्थितांना मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामनावमीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाअंती सर्व उपस्थीतानी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *