हमालपुरा श्रीराम नवमी उत्सव समितीच्या शोभायात्रेत विविध चित्ररथांचे दर्शन प्रभू श्रीरामचंद्रांची आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते महाआरती

हमालपुरा येथे श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार-सौ. सुलभाताई संजय खोडके उपस्थित होत्या. यादरम्यान आमदार-सौ. सुलभाताई खोडके व यश खोडके यांच्या हस्ते कौसल्यानंदन प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन-माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी सर्व भाविकाभक्तांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तसेच सर्वाना सुख समृद्धी,अनारोग्य व दीर्घकालीन मंगल लाभ व्हावा याकरिता मर्यादापुरुषोत्तम श्रीरामरायाच्या चरणी प्रार्थना केली. तद्नंतर सुलभाताई यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी सर्व उपस्थितांना श्रीरामनवमीच्या पावनपर्वावर हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांचे वतीने जय श्रीराम-जय श्रीराम चा एकच जयघोष करण्यात आला. यासोबतच सियावर रामचंद्र की जय च्या गगनभेदी घोषणांनी यावेळी आसमंत दणाणून गेला होता.तद्नंतर श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने आयोजित भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *