भातकुली पंचायत समिती मधिल शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवा. प्राथमिक शिक्षक समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन

भातकुली दि.७-
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा भातकुली कडून गटशिक्षणाधिकारी दिपक कोकतरे यांना निवेदन सादर करण्यात आले, पं.स.मधिल शिक्षकांच्या समस्या /मागण्या प्रलंबित आहे.ते तात्काळ सोडविण्याची विनंती तालुकाध्यक्ष तथा संचालक उमेश चुनकीकर,तालुका उपाध्यक्ष संतोष राऊत,शैलेन्द्र दहातोंडे यांनी गटविकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी यांना केली आहे..
भातकुली मधिल कार्यरत शिक्षकांचे प्रमुख मागण्या मध्ये शिक्षकांचे पगार बिल प्रत्येक महिन्याच्या २० तारखेपर्यंत तयार होवून तपासणी करिता लेखा विभागात सादर व्हावे.
लेखा विभागाने वित्त विप्रेशन प्राप्त होताच तात्काळ पगाराचा चेक तयार करून कार्यालयामार्फत बँक मध्ये पोहचवून द्यावा.
सन -२०१८ मध्ये चटोपाध्याय वेतन श्रेणी लागू झालेल्या शिक्षकांना स्वीकृती मिळाली नाही, ती स्वीकृतीची कार्यवाही करून ,त्या शिक्षकांची थकबाकी काढण्यात यावी.NPS धारक काही शिक्षकांना प्राण किट मिळाल्या नाहीत त्या मिळण्यात याव्या.
NPS धारक शिक्षकांना ज्या हिशेबाच्या पावत्या मिळाल्या आहेत त्यामध्ये बरीच तफावत आहे,ती तफावत दूर करून अचूक हिशेब मिळण्यात यावा.*
GPF धारक शिक्षकांना GPF च्या स्लिप पं. स.स्तरावर मिळण्यात याव्यात.प्रलंबित वैद्यकीय देयके,प्रलंबित वेतन तात्काळ काढण्यात यावे.
सेवानिवृत्ती शिक्षक यांचे गटविमा, GPF संबंधीची कार्यवाही करण्यात यावी कुठलेही प्रकरण प्रलंबित राहणार नाही याची काळजी घ्यावी.
सेवापुस्तके अद्ययावत करण्यात यावे.
भातकुली मधिल शिक्षकांचे माहे मार्च २३चे वेतन रमजान ईर्द पूर्वी म्हणजे २२एप्रिल पूर्वी करण्यात यावे.शाळांना समग्र शिक्षा अनुदान,४%सादिल रक्कम मिळावी,शालेय पोषण आहार अनुदान,स्वंयपाकी,मदतनिस यांचे मानधन मार्च २०२३पर्यंत मिळावे तसेच इतर प्रलंबित प्रश्न व समस्या निकाली काढण्या करीता शिक्षण विभागातील अधिक्षक,बिट लिपीक यांची संयुक्त सभा घेऊन आढावा घेण्यात यावा आणि शिक्षकांचे प्रश्न निकाली काढावे अशी मागणी प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा भातकुलीने केली आहे.असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *