ममदापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र लवकरच जनतेचा सेवेत.

आमदार यशोमती ठाकूर यांच्या आरोग्य विभागास सूचना.

तिवसा.
तालुक्यातील बरेचदिवसांपासून बहुचर्चित लक्ष लागून असलेले ममदापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे आता लवकरच जनतेचा सेवेत सुरू होणार आहे.या करिता नुकतीच वणी ममदापूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच मुकुंद पूनसे यांनी विभागाच्या कर्तव्यदक्ष आमदार श्रीमती यशोमती ठाकूर यांची भेट घेत उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली.

या वेळी आमदार ठाकूर यांनी तत्काळ तालुका आरोग्य यंत्रने सह जिल्हा आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधत ममदापूर येथे उभारण्यात आलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे लवकरात लवकर आणि जलद गतीने जनतेच्या सेवार्थ सुरू करून त्या ठिकाणी परिसरातील येणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आरोग्याचा सोईसुविधा मिळाव्या अश्या सूचना वजा इशारा दिला असून.

आता लवकरच वणी ममदापूर सुलतानपूर काटसुर इसापूर नमस्कारी फत्तेपूर आदी गावातील नागरिकांना आरोग्याच्या सोईसुविधा मिळणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळनार आहे.कारण परिसरात कुठेहे आरोग्याच्या प्राथमिक सोईसुविधा सुद्धा मिळत नसल्याने नागरिकांना थेट तालुक्याच्या ठिकाणी तिवसा येथे यावे लागत होते.त्या मुळे नागरिकांची आर्थिक हानी होऊन वेळेत उपचार मिळत नव्हता त्या मुळे आरोग्याच्या बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत होते.परंतु आता लवकरच हे उपकेंद्र सुरू होणार असल्याने परिसातील नागरिकांना आर्थिक बचती सह आरोग्याचा सुविधा मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळनार असून आरोग्याचे प्रश्न देखील सुटणार आहे.या वेळी तिवसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योस्ना पोटपिटे (देशमुख) माजी सरपंच मुकुंद पूनसे ममदापूर सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष राधेश्याम महात्मे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *