BULDHANA | अवकाळी पावसाने साडेपाचशे हेक्टरवरील केळीचे नुकसान ; शेतकरी आर्थिक संकटात

बुलढाणा जिल्ह्यात खामगांव तालुक्यातील वर्णा, काळेगाव, ढोरपगाव शिवारात सुरुवातीला ०९ एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे वर्णा शिवारातील जवळपास ४०० शेतकऱ्यांमच्या केळीला फटका बसला होता. झाडे आडवी पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. त्यानंतर १८ एप्रिललाही येथे थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला.

दोन नैसर्गिक आपत्तीतून काही प्रमाणात बचावलेली केळी मोठ्या प्रमाणात गारपीट आणि अवकाळी पावसाने भुईसपाट झाली आहे. केळीच्या पानांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने, उत्पादन क्षमतेवर परिणामाची शक्यता आहे. मागील काळात सुद्धा पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागील काढलेले कर्ज फेडण्यासाठी परत कर्ज काढून केळीची लागवड केली होती. मात्र हाता तोंडाशी आलेला घास या पावसामुळे व गारपिट झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *