JALNA | ऑनलाईनद्वारे फसवणुक झालेली रक्कम तक्रारदारास २४ तासाच्या आत मुळ स्वरुपात परत, सायबर पोलिसांची कामगिरी

ऑनलाईनद्वारे फसवणुक झालेली रक्कम तक्रारदारास २४ तासाच्या आत संपुर्णपणे मुळ स्वरुपात परत करत सायबर पोलिसांनी पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. तक्रारदार अमितकुमार गणेशराव लोखंडे रा. जालना यांना दिनांक 30/05/2023 रोजी सायंकाळी त्यांचे ICICI Bank चे क्रेडीट कार्डची लिमिट वाढवुन देतो म्हणून अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. त्यावरुन फिर्यादी यांनी सदर व्यक्तीस सांगितल्याप्रमाणे क्रेडीट कार्ड व ओटीपीची माहिती दिल्याने फिर्यादी यांच्या क्रेडीट कार्डमधून एकूण 53,678 रुपये पुढे वळते होऊन ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली होती. सदर प्रकरणात तक्रारदार यांनी तात्काळ पोलीस ठाणे सायबर येथे संपर्क करुन गुन्ह्यासंबंधाने माहिती पुरविली होती.

त्या अनुषंगाने पोलीस ठाणे सायबर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले. मग पुढे सदरची माहिती विविध पोर्टलकडून प्राप्त करुन घेऊन तक्रारदार यांची रक्कम पुढे वळविण्यात आलेल्या वॉलेटला तात्काळ पत्रव्यवहार केला. संबंधित नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क केला. सदर रक्कम फ्रीज करणे बाबत कळविले होते. तसेच संबंधित वॉलेटला सतत पाठपुरावा करुन तक्रारदार यांचे फसवणुकीद्वारे वळविलेली रक्कम 53,678/- रुपये 24 तासाच्या आत तक्रारदार यांचे ICICI Bank चे क्रेडीट कार्डमध्ये मुळ स्वरुपात परत प्राप्त झाल्याचे संबंधित वॉलेटला कळविले आहे.

तक्रारदार यांना पैसे लगेचच परत मिळाल्यामुळे पोलिसांच्या कार्यवाहीबाबत तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. तुषार दोषी, पोलीस अधीक्षक, जालना, श्री. डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे सायबर चे पोलीस निरीक्षक श्री. मारुती खेडकर, अंमलदार लक्ष्मीकांत आडेप किरण मोरे, सुनिल पाटोळे यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *