AHMEDNAGAR | निळवंडे धरणाचे पाणी 53 वर्षांनी शेतकऱ्यांच्या शेतात – एकनाथ शिंदे

निळवंडेचे पाणी धरणातुन सोडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की मार्चच्या अर्थसंकल्पात अडीचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली त्यामुळे निळवंडे धरणाचे काम थांबले नाही पाहिजे. हा दृष्टिकोन समोर ठेवून कॅनॉलची पाणी चाचणी करत आहोत हा खूप अभिमानाचा क्षण आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री यांनी काढले. या कामाबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे वेळोवेळी पाठपुरावा करत होते. यामुळे निळवंडे कामाला गती मिळाली त्याचबरोबर निळवंडेचे काम सुद्धा न थांबता पूर्ण व्हावे असे आम्ही आदेश पाटबंधारे विभागाला दिले होते. असेही त्यांनी सांगितले आहे. या कामाच्या वेळी अनेक अडथळे निर्माण झाले त्यावेळेस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की हे सर्व अडथळे माजी आमदार मधुकर पिचड यातून मार्ग काढतील यासाठी त्यांची भेट घेतली. शिर्डी मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे व मधुकर पिचड यांनी रखडलेल्या 22 किलोमीटरच्या कामातून मार्ग काढत हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषात सांगितले की या पाण्याची 53 वर्षे प्रतीक्षा करत होतो. पण आज प्रत्यक्षात कॅनॉलच्या पाण्याची चाचणी करत कॅनलद्वारे पाणी सोडण्यात आले. हा क्षण अतिशय खडतर प्रवासातून गेला या निळवंडे धरण्यासाठी मधुकर पिचड व खासदार सदाशिव लोखंडे आग्रह होते. काम लवकरात लवकर होऊन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जावे अशी त्यांची आग्रहाची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी या कामाचा पाठपुरावा केला. आज शेतकऱ्यांना पाणी मिळाले आहे. शेतकऱ्यांचे योगदान त्याच पद्धतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे व मधुकर पिचड यांनी जे काही नियोजन केले त्या नियोजनातून आज शेतकऱ्यांना पाणी मिळाले. ते पण 53 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी गेले अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली आहे. त्यांनी सांगितले की हे सरकार शेतकऱ्यांचे आहे मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काय पाहिजे काय नाही याची मला पूर्णपणे जाणीव आहे माझा बळीराजा सुखी राहिला पाहिजे हेच माझ्या सरकारचे ध्येय धोरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *