झोन क्र.५ अंतर्गत अतिक्रमण निर्मूलनाची संयुक्तीक कार्यवाही

झोन क्र.५ भाजीबाजार अंतर्गत अतिक्रमण विभागामार्फत सराफा, महाराणा प्रताप चौक, नागपुरी गेट, वलगाव रोड, धरम काटापर्यंत अतिक्रमण निर्मूलनाची संयुक्तीक कार्यवाही करण्यात आली. सदर ठिकाणी रोडच्या दोन्ही बाजुंनी अतिक्रमण निर्मुलनाची कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाही दरम्यान पोस्‍टर, होर्डींग बोर्ड, हातगाडी, वजन काटे, स्‍टील रॅक, गाडीचे टायर इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. सदर कार्यवाहीत झोन क्र.५ चे श्‍याम चावरे, कनिष्‍ठ अभियंता सय्यद शहाजेब, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *