महिला सक्षम व सबळ असतील तरच सामाजिक व आर्थिक स्थित्यंतरे शक्य असतात – आमदार सौ. सुलभाताई खोडके

  • स्त्री हा सामाजिक विकासाच्या संकल्पनेचा केंद्रबिंदू ठरला आहे -आ.सौ. सुलभाताई खोडके
  • एकपात्री एकांकिका-सामूहिक नृत्य-गणेश वंदना-एकल नृत्याचे सादरीकरण ठरले विशेष आकर्षण
  • पंचचक्र बहुउउद्देशीय संस्था महिला मंडळाचे वतीने जागतिक महिला दिनी स्त्रीशक्ती सन्मान सोहळ्याचे भव्य आयोजन
  • क्षमतेला भरारीकरिता हवे असलेले पंख लाभल्याने बळावलेल्या आत्मविश्वासाने महिलांच्या आशा-आकांक्षा फुलल्याचा अभिनव संदेश

समाज, संस्कृती, साहित्य आणि परंपरांचा मागोवा घेत कित्येक शतके मागे गेले तर एक गोष्ट प्रकर्षाने पुढे येते; ती म्हणजे, हे सारे घडविण्यात, जोपासण्यात आणि विकसित करण्यात स्त्रीशक्तीचा वाटा मोठा आहे. काळ बदलत गेला तसतशी समाजाची मानसिकता प्रगल्भ होत गेली आणि काळाच्या प्रवाहात, जुन्या बुरसटलेल्या प्रथा आणि परंपरा विसर्जित होत गेल्या,तसतशी स्त्रीला तिच्या हक्काची सामाजिक प्रतिष्ठा मिळत गेली.स्त्रीचे कुटुंबकेंद्रित व्यक्तिमत्त्व विकसित होत गेले आणि समाजाची जडणघडण करण्याच्या सामूहिक प्रक्रियेतही स्त्रीने आपली क्षमता सिद्ध करण्यास सुरुवात केली. इतिहासाची ती पाने आता वर्तमानकाळाच्या टप्प्यावर येऊन दाखल झाली आहेत.आता तर स्त्री हा सामाजिक विकासाच्या संकल्पनेचा केंद्रबिंदू ठरला आहे. महिला सक्षम व सबळ असतील तरच सामाजिक व आर्थिक स्थित्यंतरे शक्य असतात.महिलांच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. ही केवळ एका विकासाची वाटचाल नाही, तर ज्या संस्कृतीने महिलांच्या सन्मानाची शिकवण दिली, त्या संस्कृतीची जपणूक आणि जोपासना करण्याच्या ध्यासाची वाटचाल आहे.देशभरातील महिला आज आर्थिकदृष्ट्या केवळ सक्षमच नव्हे,कौंटुंबिक जीवनमान उंचावण्याच्या प्रक्रियेचा आधारस्तंभ ठरल्या आहेत.असे प्रतिपादन आमदार-सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी रविवार दिनांक १७ मार्च २०२४ रोजी पंचवटी व चक्रपाणी कॉलोनी येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधून केले. पंचचक्र बहुउद्देशीय विकास संस्था महिला मंडळच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी पंचचक्र बहुउद्देशीय विकास संस्था महिला मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक विमलताई खवले व शोभाताई मोहोड यांच्या हस्ते आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचा शाल व वृक्षरोपटे देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच विविध क्षेत्रात अलौकिक योगदान देणाऱ्या संजीवनी मारोटकर, प्रतिभा भडांगे, गीतांजली ब्राह्मणे, प्रीती गाढवे, अलका कुऱ्हेकर या महिला भगिनींचा आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते शाल व वृक्षरोपटे देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. प्रत्येक मुलीमध्ये, स्त्रीमध्ये प्रचंड इच्छाशक्ती, श्रमशक्ती बुद्धी असते. फक्त तिला योग्यवेळी, योग्य दिशा व संधी मिळणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला भगिनींना सामूहिक ऐक्याचे महत्व पटवून देण्यासाठी व त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा उद्देश बाळगून खासकरून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकपर संबोधनात प्रा. अनिता खवले यांनी अशी माहिती दिली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमा दरम्यान श्रद्धा वसुकर, मोना किर्दक, संगीता बेलोकार, शुभांगी गणोरकर, जान्हवी बेलसरे, प्रतिभा बेलसरे, वंदना बागल, संध्या गंधे, कल्पना वैद्य, संगीता तायडे, वनिता घुलक्षे, अलका कुऱ्हेकर, नंदा उभाड, सपना क्षीरसागर, सरोज वानखडे, दीपा हरणे, प्रीती हाडोळे, सोनाली देशमुख, अनिता खवले, किरण सपकाळ, उषा वानखडे, सपना कर्जत, आशा मेंढे, निलिमा घुरडे, संगीता तायडे, कल्पना वैद्य, वनिता घुलक्षे, अलका कुऱ्हेकर, नंदा उभाड, शीतल राऊत, मनीषा ठाकरे, राणी पेठेकर, मोना पेठेकर, वर्षा कुऱ्हेकर या महिला भगिनींनी गणेश वंदना, सामूहिक नृत्य, एकल नृत्य, एकपात्री एकांकिका, सुमधुर गाण्यांचे अप्रतिम असे सादरीकरण करीत याप्रसंगी उपस्थितांचे लक्ष वेधले होते. आपल्या अंगीभूत कलागुणांचे सादरीकरण करतांना या महिला भगिनींच्या द्वारे साकारण्यात आलेल्या एकापेक्षा एक सरस अशा कलाकृतीला सर्व उपस्थितांच्या वतीने यावेळी त्यांना प्रोत्साहन देत टाळ्यांच्या गजरात दाद देण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन-कल्पना वैद्य यांनी केले. यावेळी पंचचक्र बहुउद्देशीय विकास संस्था महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्या तसेच आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *