वर्ष २०२३-२४ अंतर्गत अमरावती विभागीय क्रीडा संकुल इमारत बांधकामाकरिता ५ कोटींचा निधी वितरित

  • आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नाने शासनाच्या क्रीडा विकास धोरणांचा अमरावतीला पुरेपूर लाभ
  • राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे मानले आभार

अमरावती १७ मार्च :- अमरावती विभागीय क्रीडा संकुलाचे नूतनीकरण व क्रीडा सेवांच्या विस्तारित बांधकामांच्या सुधारित अंदाजपत्रक व आराखडा मंजूर करण्यात यावा, याबाबत अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी शासनाकडे पाठपुरावा चालविला असता २९ कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे. त्याअनुषंगाने पहिल्या टप्प्यात वर्ष २०२३-२४ करीता ५ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. या बद्दल आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

अमरावती नगरीचे क्रीडा वैभव असलेल्या विभागीय क्रीडा संकुल येथे विविध खेळ व क्रीडा प्रकारांचे शिक्षण व प्रशिक्षण व स्पर्धा आयोजनांची चांगली सुविधा आहे. या संदर्भात आणखीन चांगले नियोजन केल्यास , चांगले क्रीडा इन्फ्रास्ट्रक्चर वाढविल्यास त्याठिकाणी नावीन्यपूर्ण खेळांची सोय व राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धाचे आयोजन होऊ शकते. त्यामुळे शासनाच्या क्रीडा विकासाच्या धोरणांतर्गत अमरावतीच्या विभागीय क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा संकुलाला याचा लाभ व्हावा म्हणून आमदार महोदयांनी क्रीडा विकास व आवश्यक सुविधा निर्मितीचा कृती आराखडाच तयार करून संबंधित विभागीय क्रीडा विकास समिती व क्रीडा व युवक सेवा संचालनालय सोबत योग्य सुसंवाद व समन्वय प्रस्थापित केला केला आहे. या संदर्भात दरम्यानच्या काळात अनेकदा आढावा बैठका घेऊन व पाहणी सुद्धा करण्यात आली.

दरम्यानचे काळात मागील २६ सप्टेंबर २०२३ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय क्रीडा विकास समितीची बैठक घेऊन रुपये २९ कोटी ३२ लक्ष ८१ हजार इतक्या खर्चाचे सुधारित अंदाजपत्रक व आराखडा तयार करण्यात आला. समितीने तो आराखडा शासनास सादर करावा व यासंदर्भात निधी घेऊन आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असून कुठलाही निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास आमदार महोदयांनी दर्शविला होता.

तदनंतर आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार तसेच क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्याकडे पाठपुरावा करून अमरावती विभागीय क्रीडा संकुल येथील बांधकामासंदर्भात सुधारित अंदाजपत्रक व आराखडा मंजूर करण्याची विनंती केली असता मागील २६ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या राज्य क्रीडा विकास समितीच्या बैठकीत अमरावती विभागीय क्रीडा संकुल बांधकामाकरिता २९ कोटी ३२ लक्ष ८१ हजार इतक्या खर्चाचे सुधारित अंदाजपत्रक व आराखडा आदी बाबींना प्रशासकीय मान्यता देण्यात आली व यासंदर्भात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शासन निर्णय निगर्मित करण्यात आला. दरम्यान निधी वितरित करण्याला घेऊन आमदार महोदयांनी शासनाकडे पाठपुरावा केला असल्याने आता वर्ष २०२३-२०२४ अंतर्गत पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. अमरावतीच्या क्रीडा विकासाला अधिक बळकटी देण्यासाठी वेळोवेळी सहकार्य केल्या बद्दल आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

अमरावती विभागीय क्रीडा संकुल मधील विद्यमान इनडोअर हॉलचे नूतनीकरण , विद्यमान छतावरील पत्रे काढून टाकणे, आणि गटर आणि फ्लॅशिंगसह नवीन डबल स्किन स्टँडिंग सीम रुफिंग प्रदान करणे, बाष्पीभवन कामांचे नूतनीकरण , ४०० मीटर सिंथेटिक धावनपथ (९ लेन्सचा व ८ गोलाकार लेन्स ), ग्रास फुटबॉल मैदान , अँथलेटिक्स क्रीडा साहित्य फुटबॉल मैदानाची सिंचन व्यवस्था, नेट बॉल सिंथेटिक फ्लोरिंग , बाहेरील टेन्सिल रूफ , बाहेरील रस्ते विद्युतीकरण , ३ लक्ष लिटर वरची टाकी बांधकाम करणे , सिंथेटिक जॉकिंग ट्रॅक , सिंथेटिक स्केटिंग रिंग आदी कामे करण्यात येणार आहे.

विभागीय क्रीडा संकुल हे अमरावतीचे क्रीडा वैभव आहे. याठिकाणी चांगल्या क्रीडा सुविधांची निर्मिती व अन्य उपलब्धी करण्यासह खेळाडूंसाठी दर्जेदार अशी संसाधने व भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. यासोबतच परिसराला हरित , स्वच्छ व सुंदर असे स्वरूप व आकर्षकता वाढविण्याच्या दृष्टीने चांगला लँडस्केप तयार करण्याचा मानस आहे. लवकरच क्रीडा संकुल येथील हॉस्टेल मध्ये अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर ने परिपूर्ण सुविधा निर्माण केल्यास देशभरातून खेळाडू क्रीडा संकुलाकडे आकर्षित होईल ,व अमरावतीला राष्ट्रीय -आंतर राष्ट्रीय पातळीवर क्रीडा लौकिक प्राप्त होईल. – आ.सौ. सुलभाताई संजय खोडके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *