आरटीओच्या ३० सेवा झाल्या आता फेसलेस प्रत्यक्षात कार्यालयात येण्याची गरज नाही

आरटीओ कार्यालयाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात न येता ऑनलाईन पद्धतीने घरूनच इंटरनेटच्या मदतीने आता ३० सेवांचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आधार कार्डला मोबाईल क्रमांक जोडलेला असणे आवश्यक असून त्याशिवाय फेसलेस पद्धतीचा लाभ घेता येणार नसण्याचे आरटीओ विभागाकडून सांगण्यात आले आहे. या प्रक्रियेनुसार अर्जदार ऑनलाईन पद्धतीने “सारथी डॉट परिवहन डॉट जिओव्ही डॉट इन” या वेबसाईटवर जाऊन फेसलेस हा पर्याय निवडून आधार क्रमांक टाकून नंतर ओटीपी ची नोंदणी केल्यानंतर वाहन मालकाचे नाव व कार्यालय याबाबत अभिलेखावरील नावाची खातरजमा होणार आहे. त्यांनंतर आवश्यक कागदपत्रे त्याच ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे. या सेवेचा लाभ घेतल्यास आरटीओ संबंधित कामांसाठी कार्यालयात येऊन वेळ खर्च करावा लागणार नाही . अधिकाधिक नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन आरटीओ अधिकारी राजाभाऊ गीते यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *