कोकणात आजही पारंपारिक पद्धतीच्या शेतीला प्राधान्य

बऱ्याच दिवसांपासून कोकणामध्ये दडी मारून बसलेला मान्सून आता मुसळधार पडत आहे. त्यामुळे शेतकरी थांबलेली शेतीची कामे पुन्हा एकदा नव्या व जोमाने सुरू करत आहेत. भात शेती ही पावसाळ्यावर अवलंबून असणारी शेती आहे. यामुळे कोकणातील प्रमुख भात शेती शेतकरी करताना दिसत आहेत. जग आधुनिक पद्धतीने जीवन जगत असताना देखील आजही कोकणात पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. महाग झालेले इंधन, यंत्र, यंत्रसामुग्री, अवजारे यामुळे कोकणातील शेतकरी वर्ग पारंपारिक शेतीचा मार्ग अवलंबत आहे. आणि पावसाचे आगमन हे कोकणात झाल्यामुळे शेतकरी हे आनंदी दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *