छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली – आमदार सुलभाताई खोडके

  • लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर व वृक्षरोपटे वाटप
  • छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव समितीचे वतीने राबविण्यात आला अभिनव उपक्रम

अमरावती दिनांक २६ जुन : छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळला जातो. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहू महाराजांनी केले. म्हणूनच ते लोककल्याणकारी राजे ठरले. सामाजिक न्यायाची भूमिका वठवीत शाहू महाराजांनी सामाजिक समतेसाठी केलेले कार्य हे अविस्मरणीय आहे. राजर्षी शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबविलीत. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. स्वातंत्र्यापूर्वी कित्येक वर्षांपूर्वी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्वे शाहू महाराजांनी अंमलात आणली. असे प्रतिपादन आमदार- सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधून केले.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव समिती प्रभाग क्रमांक -१०, अमरावती द्वारे आयोजित सोमवार दिनांक २६ जून २०२३ रोजी यशोदा नगर चौक समीप सखा मंगलम येथे आयोजित भव्य रक्तदान शिबीर व वृक्ष रोपटे वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या उदघाटीका-आमदार-सौ. सुलभाताई खोडके, अमरावती जिल्हा रक्तदान समितीचे अध्यक्ष-महेंद्र भुतडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे, नगररचना विभागाचे सेवानिवृत्त संचालक-कमलाकर आकोडे, हॉस्पिटलचे संचालक-डॉ. समीर चौधरी, डॉ. निखिल चांदूरकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष-शिवश्री-आश्विन चौधरी, महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती-अविनाश मार्डीकर, माजी नगरसेवक-मंगेश मनोहरे आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, वंदन, माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तदनंतर आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिथींची समयोचित भाषणे झालीत. संकल्प नवा, ध्यास नवा-प्रत्येक घरी एक रक्तदाता हवा… या संकल्पनेतून आयोजित या रक्तदान शिबिराचे स्थळी स्वेच्छा रक्तदान करीत आपल्या सामाजिक दायित्वाची पूर्तता करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच पर्यावरणाचा समतोल यथावत कायम राखण्यासाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, वृक्षलागवड, वृक्षांची निगा राखणे याकरिताच आयोजित वृक्षरोपटे वाटप कार्यक्रमादरम्यान आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते स्थानिक नागरिकांना विविध प्रकारच्या प्रजातींचे वृक्ष रोपट्यांचे वितरण करण्यात आले. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या या अभिनव उपक्रम प्रसंगी सौ. सुलभाताई खोडके यांनी अविनाश मार्डीकर तसेच त्यांच्या सर्व सहकारी बांधव-भगिनींसह, छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव समितीचे सदस्य व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत त्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक दरम्यान माजी नगरसेवक-अविनाश मार्डीकर यांनी थोर कल्याणकारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त खासकरून भव्य रक्तदान शिबीर व वृक्षरोपटे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून देण्यासह राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी लोककल्याणकारी विचारांचा व कार्याचा वसा दिला. त्यापासून प्रेरित होऊन आगामी काळात विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्याचा आमचा मानस असल्याचे सांगितले.

यावेळी अविनाश मार्डीकर, मंगेश मनोहरे, अरविंद गावंडे, संजय ठाकरे, ऋतुराज राऊत, श्रीधर देशमुख, सनी चव्हाण,प्रा. डॉ. श्याम दळवी,संदीप आवारे,अमोल देशमुख, पुरुषोत्तमराव राणे,रामदासजी नागपुरे, शिवपाल ठाकूर,संजय यादव,चेतन वाठोडकर, मनीष जगताप, प्रशांत निर्मळ, निलेश कानचनपुरे, राजीव ठवरे, भास्करराव ढेवले, चंद्रशेखर हिवराळे, निलेश शिंगरवाडे, सुरेशराव इंगोले, संजय विंचूरकर, शाहाकार, अजय बोन्डे, संजय कोनगले, प्रशांत डांगे, राजेश देशमुख, छोटू राऊत, अमोल प्रांजळें, सुनील वरठे, भास्करराव रोहणकर, अनिल कदम, बाळासाहेब होले, ऍड. छाया मिश्रा, ममता आवारे, मेघा ढबाले, अंबिका मार्डीकर, कांचन देशमुख, अनिता जवंजाळ, अस्मिता तायडे, जयश्री ठवकर, रिता मेश्राम, मंजुषा ठाकरे, रवी कदम,विष्णुपंत कांबे, दिवाकरराव ठाकरे, अतुल बिडकर, सचिन वानखडे, गौरव खोंड, डॉ. युवराज बंड, अंकुश किंनिकर, मिलिंद मानकर, अमित भुयार, सुमित भुयार, पांडुरंग चण्डिकापुरे, विजय यावले, प्रा. डॉ. श्याम सोमवंशी, प्रा. किशोर तायडे, ऍड. प्रवीण देवळे, प्रशांत दळवी, अनंत उर्फ बाळासाहेब काळे, अरविंद मनवर, श्रीकांत मेश्राम, रंजन तिवारी, सुधीर तिवारी, रुपेश तिवारी, ऍड. आशिष त्रिपाठी, मुन्ना मिश्रा, ओमप्रकाश मिश्रा, अमोल पंडित, दिनेश वघाडे, अरूनभाऊ कडू, उत्तमराव शिंगणापूरे, नारायणराव दहाट, सागर वांगे, किशोर अरडक, अमोल कावरे, सनी कदम, योगेश थेलकर, गुणवंत पाटील, उज्वल थोरात, बंडूभाऊ बोबडे, बंटी काळे, चंदूभाऊ कांबळे, मंगेश तायडे, अतुल खोंबाडे, संघपाल पिलावंन, प्रवीण माथुरकर, आकाश बंगाळे, प्रकाश खडसे, मयूर थोरात, अतुल इटनकर, रुपेश मोहोड, आकाश बामणे, प्रणित काळे, प्रतीक भैसे, संजय ठाकरे, पद्माकर गोलाईत, दिनेश पाटील, पंकज जाचक, प्रवीण गोलाईत, अमित कदम, संदीप कदम, अक्षय चव्हाण, निलेश पडोळे, संदीप इंगळे, लक्ष्मण चाफळकर, ऋषभ मेश्राम, सुनील बनसोड, सुबोध कराडे, लक्ष्मीकांत साळवे, अमोल टवलारे, अजित भिसे, रोहित चौधरी, पंकज वानखडे, मंगेश वरखडे, पंकज आसरे, स्वप्नील विंचूरकर, सुधीर फेंडर, दिनेश लोखंडे, धनंजय नळसकर, किशोर राऊत, विशाल सव्वालाखे, अविनाश देशमुख, सागर आठवले, छोटू दांडगे, गजाननराव हिवसे, आनंद राणे, आशिष श्रीखंडे, प्रथमेश मार्डीकर, यश मानकर, यश हिवराडे, ऋत्विक तायडे, श्याम वानखडे, सिद्धार्थ राऊत, अतुल जगताप, सागर काळे, गणेश ढोके, निलेश ढोके, शुभम सिरसाट, रोहित काळे, शिवा सिरसाट, स्वप्नील सावंत, अलकेश रोडगे, गोलू पाटील, आदींसह छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव समिती प्रभाग क्रमांक १० चे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-ऍड. छाया मिश्रा यांनी तर प्रास्ताविक-अविनाश मार्डीकर तसेच आभार प्रदर्शन-माजी नगरसेवक-मंगेश मनोहरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *