NASHIK | चाकूचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

येवला कोपरगाव रोडवर तहसील कार्यालयाजवळ अजय राजेंद्र वाळके हे पायी जात असताना त्यांना दोन अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील मोबाईल तसेच रोख रक्कम घेऊन चोरी करून तिथून पळ काढला होता. यासंदर्भात वाळके यांनी येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली केली होती. याचीच दखल घेऊन गुन्हा देखील दाखल झाला होता. याच गुन्ह्याचा तपास येवला शहर पोलीस पथकाने करत या चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *