यंत्रणा, गुणवत्ता व वेग या त्रिसूत्रीतून नवसारी प्रभागात आमदार सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नांतून रस्त्यांचा कायापालट

  • ९०.११ लक्ष निधीतून गार्डन सिटी-कठोरा रिंग रोड नवसारी गावठाण – यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ-रेखा कॉलोनी-जवाहर नगर येथे विकासकामांना प्रारंभ
  • जनतेचे लाभणारे सातत्यपूर्ण समर्थन व विश्वासामुळेच विकासकामांना गती – आमदार सुलभाताई खोडके
  • आ. सुलभाताई खोडके यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना-परिकल्पनेतून शाश्वत विकासाला गती

अमरावती दि. 30जुलै- वाढत्या शहरीकरणामुळे नियोजन करीत आणि विकासकामांचे पूर्ततेसाठी आपण कटिबद्ध आहोत.प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम,खडीकरण, सुधारणा व डांबरीकरण आदी कामांची पूर्तता करताना यंत्रणा,गुणवत्ता तसेच वेग,यासोबतच नागरिकांच्या आशिर्वादरुपी पाठबळाची सातत्यपूर्ण साथ आपणास नेहमीच मोलाची ठरत आहे. जनतेच्या निवेदनांचा व सूचनांचा आदर करीत नाविन्यपूर्ण संकल्पना देऊन विविध प्रभागात विकासकामांचा समतोल राखण्यासाठी आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे. नागरिकांचे अमूल्य समर्थन व विश्वास कायम राखीत दर्जेदार नागरीसुविधांची उपलब्धता करून देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. सामाजिक उत्तरदायित्वाच भान राखीत प्राप्त झालेल्या निवेदनांतून तसेच नागरिकांसोबत झालेल्या संवादातून निदर्शनास आलेल्या समस्या लक्षात घेता, आगामी काळात या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्याला आपली प्राथमिकता राहील.असे प्रतिपादन आमदार -सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी प्रभाग क्रमांक-३ स्थित यांनी रुपये ९०.११ लक्ष निधीतून साकारल्या जाणाऱ्या विविध विकासकामांचे भूमीपूजन प्रसंगी उपस्थितांना संबोधून केले.नवसारी प्रभाग क्रमांक -३ येथील रेखा कॉलोनी-जवाहर नगर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ रोड ते कठोरा रिंग रोड, अंबा गार्डन,सिटी रिंग रोड ते नवसारी गावठाण येथिल रस्त्यांचे भूमीपूजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सर्वप्रथम अमन बोअरवेल ते कठोरा कडे जाणाऱ्या डीपी रोडची सुधारणा करणे या विकासकामांचे आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. रुपये ३६.७८ लक्ष रुपये निधीतून व आमदार महोदयांच्या प्रयत्नांतून हे काम मार्गी लागल्याने यावेळी त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तद्नंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ रोड ते कठोरा रिंग रोड पर्यंत खडीकरण व डांबरीकरण करणे या विकासकामाची कुदळ मारीत आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी भूमीपूजनाची औपचारिकता साधली. रुपये ३६.५४ लक्ष निधीतून या रस्त्याचा कायापालट होणार असल्याने यादरम्यान सुलभाताई खोडके यांचे यावेळी स्नेहिल स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी विकासकामांच्या नामफलकांचे सुलभाताई खोडके यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यासोबतच अंबा गार्डन ,सिटी रिंग रोड ते नवसारी गावठाण रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या विकासकामांचे आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.यावेळी त्यांनी प्राप्त निवेदनांचा स्वीकार करीत स्थानिकांशी संवादातून तेथील समस्या जाणून घेतल्या.रुपये १६.७९ लक्ष निधीतून स्थानिक रस्त्याचा कायापालट होत असल्याने तसेच अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्णत्वास जात असल्याने स्थानिकांचे वतीने त्यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष असलेल्या आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या सोबत आम्ही नेहमीच आहोत,असा कृतज्ञता पूर्ण विश्वास यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रशांत डवरे, मंजुश्री महल्ले,प्रशांत महल्ले,ऋतुराज राऊत,मोरेश्वर मोहोड, ऍड. माधवराव रामेकर, संजीव कथीलकर,छाया कथीलकर,मनपाचे उप-अभियंता-आशिष अवसरे,अभियंता-जयंत कालमेघ, कनिष्ठ अभियंता-अंकुर डवरे, प्रतापराव देशमुख, प्रवीण रेचे, रवी गिरी, किशोर वानखडे, प्रकाश ओइंबे, राजेश कोरडे, भोजराज काळे, दिलीपराव गुलहाने, अविनाश बोबडे, शरद पाथरे, आकाश वडनेरकर, प्रभूदास फंदे, इंजि.-चेतन ठाकूर, सुयोग तायडे, बी.जी.सोमवंशी, राजेंद्र कुऱ्हेकर, पांडुरंग कडू, राजेंद्रसिंह कश्यप, बी.एम.खंगार, एन.एन. अवझाडे, पुरुषोत्तम देशमुख, बबनराव पाटील, विजयराव देशमुख, संजय कराळे, एल.पी. सालोडे,समाधान दहातोंडे, दिवाकरराव देसली, राजेंद्र वाघमारे, शेषराव बमनोटे, मधुकरराव गोहत्रे, धनंजय साबळे, विलासराव चर्जन,नरहरी राव पखान, रामरावजी मोहकर, अनिल राऊत, सतीश मोहकर, विजयराव कांडलकर,दिनेश बीचकुंदे,सुभाषराव मेहरे,दिगंबर ठाकरे,पंडित बनसोड,दीपक बोरखडे,अतुल राऊत,अशोक इंगळे,एन.जी. माहुरे, आर.बी. देशमुख, एच.ए. टोले, एस.आर. जुनघरे,पी. व्ही. ढोक, मनगुसिंग बाबारा, रमेश ठोसर, सुभाषराव मानकर, नरेंद्र बोन्डे, डॉ. किशोर तायडे, विवेक काळे, गणेश पाबळे, प्रवीण कावरे, अमोल मोहोड, जी. डी. गायकवाड, रवी भैसे, डॉ अंकुश गिरी,प्रवीण ठाकरे, अनिल देशमुख, राजेंद्र लिखार,पंकज काळे,अनिल मोहोड, डॉ. सागर ठोसर,शैलेंद्र चौधरी,चक्रधर हिवसे,बी. एच. अडीकणे,अंबादास गायकवाड, नरेंद्र होरे,दीपक बानुबाकोडे,संजय धर्माळे, प्रदीप तायवाडे,अनिल महल्ले,प्रमोद घुरडे, मंगेश जूनघरे,कौशल्य आबासाहेब पाथरे, आर.पी. ठाकरे,आर.एस. खराटे,विनोद जावरकर, जी.के. पाटील,सचिन घोम,डॉ. राजेंद्र वानंतनी, श्याम गिरी,समाधान गाडे,नरेंद्र बोन्डे, डॉ. मिलिंद राऊत,नीरज भाटी,डॉ. ए.बी. कुकडे, आकाश हिवसे,सारंग देशमुख, सागर इंगळे, संकेत बोके, प्रथमेश बोके, जयेश सोनोने, स्वप्नील धोटे,मनीष पाटील, रणवीर देशमुख, अमित महानकर, विद्या मोहोड, मंदा सोमवंशी, सुनंदा रामेकर, अलका पाटील, सरला ढवळे, अंजली सगणे, शुभांगी सबाने, क्षिप्रा मानकर, कौशल्या शेंद्रे, वैशाली राऊत, चित्रा देशमुख, वैशाली भैसे, छाया ढोक, पुष्पां पुसदेकर, प्रतिभा मोहोड, चित्रा देशमुख, चंचल उघडे,शालिनी गादे,संध्या ठाकरे, नीलिमा उघडे,ज्योती बाभूळकर आदींसहित परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *