अखिल भारतीय बारी समाज राष्ट्रीय अधिवेशन नियोजन बैठक संपन्न

  • ऑक्टोंबर ला संत गजानन महाराज नगरीत होणार अखिल भारतीय राष्ट्रीय अधिवेशन
  • मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व इतरही मान्यवरांच्या उपस्थितीत होणार अधिवेशन

अखिल भारतीय बारी महासंघ व समस्त बारी समाजाचे वतीने श्री संत गजानन महाराज नगरीमध्ये नुकतीच स्थानीय हॉटेल प्राइड येथे नियोजन बैठक संपन्न झाली. ह्यामध्ये आगामी काळात अखिल भारतीय बारी समाजाची राजकीय सामाजिक क्षेत्रात उन्नती व्हावी ह्या उद्देशाने अखिल भारतीय बारी महासंघाचे अध्यक्ष रमेशजी घोलप यांचे प्रमुख उपस्थितीत, तर डॉ देविदासजी कोथळकर ह्यांचे अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख मान्यवरांचे उपस्थितीत शेगाव येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती, ह्यामध्ये बारी समाजाचे दैवत संत श्री रुपलाल महाराज यांना राष्ट्रसंत दर्जा मिळावा व शासनदरबारी नोंद व्हावी, तसेच अंजनगाव सुर्जी येथे श्री संत रुपलाल महाराज यांचे कर्म भूमीमध्ये राष्ट्रीय स्मारक व्हावे तसेच संपूर्ण भारतात वास्तव्यास असलेल्या समाजाला राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्थान असावे, तर बारी समाजाला आर्थिक सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात समाज विकासाच्या हेतूने अखिल भारतीय बारी समाज आर्थिक विकास महामंडळ शासनाने घोषित करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, तसेच विदर्भातील प्रमुख पीक पानपिंपरी वनौषधी पिक, पानवेली ह्या पिकाला अनुदान व त्यासाठी संशोधन केंद्र व प्रक्रिया केंद्र स्थापित करावे, तसेच आगामी काळात समाजाला विधानसभा, लोकसभा ह्या मध्ये बारी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे, तसेच राष्ट्रसंत श्री संत रूपलाल महाराज यांची जयंती व पुण्यतिथी ही शासकीय स्तरावर नोंद करून ती साजरी व्हावी व इतरही काही प्रमुख मागण्या संदर्भात सविस्तर अशी चर्चा करून आगामी 1 ऑक्टोंबर 2023 ला श्री संत शेगाव नगरीमध्ये खामगाव रोडवरील स्वर्गीय गजानन दादा पाटील नवीन मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव चे 20 एकराचे भव्यदिव्य जागेत सकाळी ११ वाजता राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतरही प्रमुख मान्यवरांचे उपस्थित अखिल भारतीय बारी समाज राष्ट्रीय महा अधिवेशन होणार आहे. ह्या संबंधी मुद्देसूद नियोजन बैठक उपस्थित समाज बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली, ह्यामध्ये काही महत्वाचे ठराव सर्व सहमतीने संमत करून त्यावर योग्य अशी चर्चा करून, व काही येणाऱ्या अडचणी, त्रुटी व आप, आपले विचार मांडून कार्यक्रमाची दिशा ठरविण्यात आली. होणाऱ्या अधिवेशनाला महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश, राजस्थान, बिहार, प्रयाग, गया, काशी, अयोध्या इ अनेक राज्यांमधून समस्त बारी समाज उपस्थित राहणार आहे. ह्यासाठी महा जात पंचायत पूर्व नियोजनाची बैठक ही 30 सप्टेंबर ला दुपारी ४ वाजता कार्यक्रम स्थळी होणार असून यामध्ये सर्व समाजा प्रति असलेल्या मागण्या यावर सखोल चर्चा करून त्या उद्घघाटकीय मान्यवरांच्या समोर अधिवेशनामध्ये सादर करण्यात येतील तरी सदरचे अधिवेशनाला सर्व समाज बांधवांनी तन-मन-धनाने सहकार्य करून अखिल भारतीय बारी समाजाला कसा न्याय देता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे प्रसिद्धी प्रमुख मनोहर मुरकुटे यांनी कळविले आहे तसेच सदरचे बैठकीचे उत्कृष्ट नियोजन हे अन्न व औषधी प्रशासन अधिकारी रतनजी फुसे यांनी केले त्यामुळे त्यांचे सर्व समाज बांधवांनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *