श्रीमद भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ पारायण स्थळी आमदार सुलभाताई खोडके यांनी घेतला कथा श्रवणाचा लाभ

  • श्री लोहाणा विदर्भ महिला विभाग -श्री लोहाणा महिला मंडळाचे वतीने भव्य आयोजन
  • युवा कथाकार श्रद्धेय नरेशभाई राज्यगुरु ( मुंबई) यांच्या सुमधुर वाणीतून भागवत कथा श्रवणार्थ भाविकाभक्तांची मांदियाळी
  • ओम नमः भगवते वासुदेवायच्या गजरात भावीकभक्त झाले तल्लीन

अमरावती ( प्रतिनिधी ) दि . ३१ | जुलै श्री लोहाना विदर्भ महिला विभाग व श्री लोहाना महिला मंडळ अमरावती च्या वतीने २६ जुलै ते १ ऑगस्ट २०२३ दरम्यान श्रीमद भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ पारायण चे आयोजन करण्यात आले आहे. कथा प्रवक्ते श्रद्धेय मगनभाई राज्यगुरु (बापजी) यांचे सुपुत्र युवा कथाकार मुंबई येथील श्रद्धेय श्री नरेशभाई राज्यगुरु यांच्या सुमधुर वाणीतून भविकभक्तांच्या वतीने श्रीमद भागवत कथा श्रवणाचा लाभ घेतल्या जात आहे. शनिवार दिनांक २९ जुलै २०२३ रोजी बडनेरा रोड स्थित महेश भवन येथे आयोजित या महाआयोजन स्थळी आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी भेट दिली.यादरम्यान त्यांनी श्रीमद भागवत सप्ताह ज्ञानयज्ञ स्थळी कथा श्रवणाचा लाभ घेतला.यादरम्यान त्यांनी श्रीमद भागवत सप्ताह ज्ञान पारायण उत्सव आयोजन स्थळी आयोजकांचे पुढाकाराने भव्यदिव्य आयोजन करण्यात आल्याबद्दल सर्व महिला भगिनींचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा देत धार्मिक आणि सामाजिक आयोजनाचे माध्यमातून सामूहिक अष्टोतरशत (१०८) पोथी श्रीमद भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ पारायण महाआयोजन करीत जणू दुग्धशर्करा योग साधल्या असल्याचा एक अभिनव संदेश दिला आहे. असे आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी आपल्या संबोधनातून सांगितले. अधिकमासाचे पावन पर्वावर वैष्णव यजमानांनी आपल्या पितृदेवतेच्या मोक्षार्थ सामूहिक पोथी पथनात सहभाग नोंदवला होता. वर्तमान विज्ञान युगात युवावर्ग यंत्रवत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. याचा परिणाम म्हणून एकत्र कुटुंब पद्धतीतून आपली वाटचाल विभक्त कुटुंब पद्धतीकडे सुरू आहे.नेमके हे चित्र बदलविण्यासाठी सामाजिक जडणघडण होत असताना सर्वांना एकत्र आणीत संघटन मजबूत करणे तसेच सर्वांची धार्मिक व सामाजिक कार्यात रुची वाढीस लागावी, याकरिताच या भव्य महाआयोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यात्मिक ज्ञान व आचरण याचे महत्व पटवून देत नरेशभाई राज्यगुरु यांनी श्री वामन जन्म यावर कथा विवेचन करीत सर्वांनी आपल्या भारतीय संस्कृती, परंपरा, अध्यात्मिकतेचा वसा जोपासणे गरजेचे असल्याचे सांगितले. सौ. मनिषाबेन मनोहरभाई आडतीया परिवार, अमरावती हे श्रीमद भागवत सप्ताह ज्ञान पारायण चे मुख्य यजमान आहेत. यावेळी श्री लोहाणा विदर्भ महिला विभाग व श्री लोहाणा महिला मंडळ, अमरावती व आयोजन समितीचे वतीने अध्यक्ष सौ. शीला पोपट व कार्याध्यक्ष-राधा राजा तसेच महिला भगिनींच्या वतीने आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचा स्नेहील स्वागत करीत सत्कार करण्यात आला. यासोबतच श्रद्धेय श्री नरेशभाई राज्यगुरु यांच्या हस्ते सुद्धा आ. सौ. सुलभाताई खोडके यांचा भावपुर्ण सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आयोजन समिती उपाध्यक्ष डॉ. जागृती शाह, वासंती राजा, पूजा गणात्रा, सरला तन्ना, मीना सोमाणी, सचिव बिंदीया परमार, रश्मी रायचुरा, सहसचिव स्नेहा दुवाणी, छाया राजा, श्रीमती कुंजन वेद, कोषाध्यक्ष हेतल हिंडोचा, भारती हिंडोचा, सह कोषाध्यक्ष संगीता दासाणी, रिया आडतीया, पी.आर.ओ.-रूपा राजा, भावना सूचक, आशा सादराणी,कार्यकारिणी सदस्या संगीता राजा, प्रीती अढिया, वैशाली पंड्या, मयुरी सेठिया, नेहा राजा, किरण गगलानी, कृपा आडतीया, सुशीला आडतीया, हेमा पटेल, शिल्पा पारेख, सीमा पच्चीगर, नेहा काटकोरिया, पूर्वी गगलानी, कीर्ती खंडेलवाल, कांचन चांडक, सावित्री लद्धा, ललिता लखोटीया, लक्ष्मी पटेल, सरस्वती पटेल आदींसह आयोजन समितीचे सर्व सदस्य अन्य पदाधिकारी तसेच श्री लोहाणा विदर्भ महिला विभाग श्री लोहाणा महिला मंडळ चे सर्व सदस्य व पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *