रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कांद्याने भरलेला ट्रॅक्टरचा अपघात; कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान

कांद्याने भरलेला ट्रॅक्टर, ट्रॉली माळीन बाबा-पिंपळगाव (नजीक) रस्त्यावर नालीत पलटी झाल्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास लासलगाव जवळ घडली आहे.या अपघातात कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले . निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील पिंपळगाव (नजीक) येथील माळीन बाबा रस्त्यावरील जाधव वस्ती वर राहणारे कांदा उत्पादक शेतकरी समाधान विनायक जाधव आपल्या ट्रॅक्टर मधून 25 क्विंटल कांदा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत घेऊन जात असतांना माळीन बाबा ते पिंपळगाव (नजीक) रस्त्याची दुरावस्था झाल्याने कांद्याने भरलेला ट्रॅक्टर, ट्रॉली आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान पलटी झाला आहे . यात शेतकऱ्याने प्रसंगावधान राखल्याने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी मात्र ट्रॅक्टर ट्रॉली आणि कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता करण्याची मागणी केली असतानाही सार्वजनिक बांधकाम व कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे . तातडीने रस्ता दुरुस्त अथवा नव्याने करण्याची मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *