अमरावती जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन त्रेवार्षिक निवडणुकीत एकता पॅनेलचे १० उमेदवार विजयी

  • सौरभ मालानी यांनी सलग तिसऱ्यांदा विजयी होत साधली अध्यक्ष पदाची हॅटट्रिक
  • सचिव पदी -राजा नानवाणी निर्वाचित, केमिस्ट पॅनेलला मानावे लागले ७ जागांवर समाधान

अमरावती जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची त्रेवार्षिक निवडणूक २०२३-२०२६ प्रक्रिया शनिवार दिनांक २९ जुलै रोजी पार पडली.एकता पॅनल व केमिस्ट या दोन पॅनल मध्ये तुल्यबळ लढत झाल्याचे चित्र यावेळी मतदान प्रक्रियेदरम्यान झाल्याचे चित्र दिसून आले. दिनांक ३० जुलै रोजी या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. दिवसभर मतमोजणी सुरू असताना मतदात्यांचा नेमका कौल कोणाला हे मात्र कोडे उलगडत नसल्याने नेमके केमिस्ट पॅनल की एकता पॅनल चे उमेदवार बाजी मारणार हे एक कोडे ठरू पाहत होते. मात्र सोमवार दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी चित्र स्पष्ट झाले. या तुल्यबळ लढतीत एकता पॅनेलने दणदणीत विजय संपादन करीत त्यांचे १० उमेदवार विजयी झाले. अमरावती जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ मालानी यांनी तिसऱ्यांदा विजयी होऊन अध्यक्ष पदाकरिता हॅटट्रिक साधली आहे. सौरभ मालानी यांनी एकता पॅनेलचे नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. या निवडणुकीत त्यांनी ११२८ मते प्राप्त करीत केमिस्ट पॅनेलचे प्रमोद भारतीया यांचा पराभव केला. जिल्हा उपाध्यक्ष निवडणूकित मनोज डफळे (एकता)यांनी १०६५ मते प्राप्त करून फिलिप कोठारी यांना पराभूत केले. तर शहर उपाध्यक्ष( रिटेल) करीता झालेल्या लढतीत अनिल टाले (केमिस्ट)यांनी ४५० मते प्राप्त करून संजय नानवाणी यांना पराजित केले.यासोबतच ग्रामीण उपाध्यक्ष( रिटेल)करीता झालेल्या लढतीत श्रीकांत राजूरकर(केमिस्ट) यांनी ४९४ मते प्राप्त करीत देवेश गनगणे यांचा पराभव केला.तसेच सचिव पदाच्या निवडणुकीत राजा नानवाणी (एकता)यांनी ८८६ मते घेऊन संजय शेळके यांना पराजित केले. तसेच कोषाध्यक्ष पदासाठी तुषार कासट(केमिस्ट) यांनी १०१३ मते मिळवीत सुयोग लद्धा यांचा पराभव केला. सहसचिव पदासाठी विवेक काळबांडे(केमिस्ट) यांनी १०४५ मते प्राप्त करीत सचिन रहाटे यांना पराजित केले.संघटन सचिव पदासाठी सागर आंडे (एकता)यांनी १२०० मते प्राप्त करून निखिल जैन यांचा पराभव केला. यासोबतच कार्यकारिणीच्या सदस्य निवडणुकीत एकता पॅनेलचे पाच तर केमिस्ट पॅनल चे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच कार्यकारिणी सदस्य ( ग्रामीण) करिता ४ उमेदवार अविरोध निवडून आले आहे. तसेच भातकुली-प्रकाश बनारसे,चांदुर रेल्वे-महेश भूत,दर्यापूर-सचिन शिरभाते, मोर्शी -गणेश गावंडे,नांदगाव खंडेश्वर-धर्मराज परळीकर, वरुड – मनोज गुलहाने हे उमेदवार निवडून आले आहेत.एकता पॅनेलचे उमेदवार यांनी १० जागांवर दणदणीत विजय संपादनाची माहिती प्राप्त होताच त्यांच्या समर्थकांनी नवनिर्वाचित अध्यक्ष-सौरभ मालानी व सचिव-राजा नानवाणी यांना खांद्यावर घेऊन एकच जल्लोष केल्याचे दृश्य यावेळी दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *