अमरावती । गर्ल्स हायस्कुल चौक ते पोलीस पेट्रोल पंप पर्यंतच्या रस्त्याच्या प्रश्न मार्गी

  • आमदार सुलभाताई खोडके यांच्या पाहणी नंतर लगेच कामाला सुरुवात
  • दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रस्ता निर्मितीसह सुशोभीकरणाची सूचना

अमरावती ३१ जुलै अमरावती शहरातील मुख्य रस्त्यांना जोडणारा व सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी अतिवर्दळीचा असलेला कॅम्प स्थित गर्ल्स हायस्कुल चौक ते पोलीस पेट्रोल पंप शिवटेकडी पर्यंतच्या रस्त्याचे वारंवार काम करून सुद्धा दरवर्षी या रस्त्याची दुर्दशा होऊन नाना-विविध समस्या निर्माण होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या संदर्भात ठोस भूमिका घेत सदर रस्ता गुणवत्तापूर्वक व दर्जेदारपणे निर्माण करण्यासह सुरक्षित अवगमनाची सुविधा होण्याबाबत अमरावती विधानसभा मतदार संघाच्या आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी अधिकाऱ्यांसमवेत रस्त्याची ऑन स्पॉट पाहणी करीत तात्काळ कामाला सुरवात करण्याची सूचना केली. यावर आता मनपा द्वारे त्वरित काम करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने गर्ल्स हायस्कुल चौक ते पोलीस पेट्रोल पंप पर्यंतच्या रस्त्याच्या प्रश्न मार्गी लागला आहे.

कॅम्प स्थित पंचवटी चौक -गर्ल्स हायस्कुल चौक ते पोलीस पेट्रोल पंप पर्यंतचा मार्ग हा शहराचा अतिशय महत्वाचा व अतिवर्दळीचा रस्ता असून या मार्गावर पोलीस वसाहत , खासगी इस्पितळ , वाणिज्य संकुल , टोपे नगर ,कलेक्टर स्टाफ कॉलनी , पंचतारांकित हॉटेल, शासकीय कार्यालय, पोलीस पेट्रोल पंप आदी भाग असल्याने हाच रस्ता अवागमनाचा मुख्य मार्ग आहे. तसेच अमरावती बस स्थानकातून सुटणाऱ्या अनेक एस. टी. बसेस ची सुद्धा या मार्गावरून वर्दळ दिसून येते . मात्र या रस्त्याची दुरावस्था झाल्याने स्थानिक नागरिकांसह , वाहनधारकांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नाने २.८० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. मात्र पावसामुळे सदर कामाला सुरुवात झाली नसल्याने आमदार महोदयांनी रस्त्याची पाहणी करीत उदघाटनाची प्रतीक्षा न करता तसेच कार्यारंभासाठी कुठलाही विलंब न करता तत्काळ रस्ता डांबरीकरण विकास कामाला सुरुवात करण्याची सूचना केली . तसेच सदर काम दर्जेदार व गुणवत्तापूर्वक करण्यासह सुरक्षित वाहतूक व अपघात विरहित अवागमन होण्यासाठी संबंधितांनी सामाजिक जाणिवेतून निर्माणकार्य पूर्ण करण्याची सूचना सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली. यावर दुसर्‍याच दिवसापासूनच कामाला सुरुवात करणार असल्याचे मनपा अभियंत्यांनी सांगितले व कार्यवाहीला घेऊन हालचाली सुरु केल्या आहेत.

पाहणी दरम्यान दरम्यान संपूर्ण रस्त्याचे अवलोकन करीत रस्त्याचे डांबरीकरण व सुशोभीकरण तसेच रस्त्याच्या दुभाजकाचे सौंदर्यीकरण करून ऑक्सिजन युक्त हिरवळ ची लागवड करावी, दुतर्फा वृक्षारोपण , प्रकाश व्यवस्था , दिशादर्शक फलक ,फुटपाथ, पाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था आदी बाबी सुद्धा रस्ता बांधकामात अंतर्भूत करण्याची सूचना सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली.

यावर आता मनपा द्वारे त्वरित काम करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने गर्ल्स हायस्कुल चौक ते पोलीस पेट्रोल पंप पर्यंतच्या रस्त्याच्या प्रश्न मार्गी लागला असून नागरिकांना चांगली सुविधा मिळणार आहे.

यावेळी आ.सौ. सुलभाताई खोडके यांचे समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके , मनपा शहर अभियंता इकबाल खान , मनपा उप-अभियंता प्रमोद इंगोले ,उद्यान अधीक्षक श्रीकांत गीरी, उद्यान निरीक्षक मुकेश खारकर , माजी महापौर ऍड. किशोर शेळके , शहराध्यक्ष प्रशांत डवरे , माजी नगरसेवक अविनाश मार्डीकर , भूषण बनसोड , रतन डेंडुले , माजी कुलगुरू डॉ. गणेश पाटील , डॉ. बी.आर. देशमुख , जीतेन्त्र सिंह ठाकूर , रामेश्वर अभ्यंकर , जुझर सैफी, प्रभाकरराव गावंडे , आनंद मिश्रा , अमोल वानखडे , प्रश्नात महल्ले , किशोर भुयार , बंडू निंभोरकर , ऋतुराज राऊत , किशोर देशमुख , राजेश कोरडे , भोजराज काळे , संजय कुकरेजा , बाळा नागे , प्रमोद महल्ले , योगेश सवई, आशिष जाजू , प्रवीण भोरे , आकाश वडनेरकर , सुयोग तायडे , प्रशांत पेठे , दत्तात्रय बागल , दिनेश देशमुख , शक्ती तिडके , अजय देशमुख , सचिन बुंदेले , चेतन तेलंग , गोपाल चिखलकर , विशाल उर्फ बाळा तायडे , अखिलेश राठोड , भास्कर ढेवळे, पप्पूसेठ खत्री, मिलिंद गिरी , कर्नल सिंग राहाल , शुभम पारोदे , आदींसह स्थानिक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *