BEED | अजित पवारांच्या स्वागतासाठी व्यासपीठावर अकरा क्विंटलचा तिरंगा हार; सभेची तयारी पूर्ण

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बीडमधील सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सभेच्या व्यासपीठावर अजित पवारांच्या स्वागतासाठी तिरंगा हार लक्ष वेधून घेत आहे. अकरा क्विंटलचा हार अजित पवारांच्या स्वागतासाठी व्यासपीठावर लावण्यात आला आहे. तर हैदराबाद आणि कलकत्त्याहून फुलं मागविण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची 17 ऑगस्टला बीडमध्ये सभा झाली होती. आणि या सभेला उत्तर म्हणून ही सभा होत असल्याचं बोललं जात आहे. सभेच्या ठिकाणी 25 हजार लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *