अमरावती | यंत्राद्वारे शहरातील विविध प्रभागामध्‍ये धुवारणी व फवारणी

अमरावती शहरात मागील काही दिवसांत मच्‍छरांचा प्रादुर्भाव वाढला असून अमरावती शहरातील प्रभागामध्‍ये तातडीने घरोघरी, प्रभागातील परिसरात धुवारणी व फवारणी करावी असे निर्देश सर्व जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक, स्‍वास्‍थ निरीक्षक व स्‍वच्‍छता कंत्राटदारांना देण्‍यात आले होते. याच दरम्‍यान शहरात मच्‍छरांचाही प्रादुर्भाव वाढत असून यामुळे डेंग्‍यु, मलेरिया आणि इतर साथ रोगांची शक्‍यता तीव्र प्रमाणात वाढू नये या अनुषंगाने स्‍वच्‍छता विभाग प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातून कामाला लागलेला आहे. स्‍वच्‍छता कंत्राटदारांच्‍या करारनाम्‍यातील नमूद अटी व शर्तीनुसार स्‍वच्‍छता कंत्राटदारांच्‍या फवारणी व धुवारणी यंत्राद्वारे शहरातील विविध प्रभागामध्‍ये धुवारणी व फवारणी करण्‍याकरीता दिनांक ३० ऑगस्‍ट,२०२३ रोजी मोहीम राबविण्‍यात आली. नागरिकांची तक्रारींचे निवारण करण्‍यात येत आहे.
मा.विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.सिमा नैताम व सहाय्यक आयुक्त झोन क्र.४ यांच्या आदेशानुसार आज दि.३०/०८/२०२३ रोजी दक्षिण झोन क्र.४ बडनेरा अंतर्गत प्रभाग क्र.२२ नविवस्ती मध्ये साफ सफाई कंत्राटदार मार्फ़त हरिदास पेठ व संभाजी नगर या परिसरात धुवारणी करण्यात आली.

मध्‍य झोन क्र. २ राजापेठ अंतर्गत प्रभाग क्र.१८ राजापेठ येथील सिंधु नगर, बालाजी नगर परिसरामध्ये धुवारणी करण्यात आली.

विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.सिमा नैताम व सहाय्यक आयुक्त झोन क्र.३ यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्व झोन क्र.३ दस्‍तुरनगर अंतर्गत प्रभाग क्र.१० बेनोड़ा-दस्तुरनगर मध्ये साफ़ सफाई कंत्राटदार मार्फ़त पंचशील नगर परिसरात धुवारणी करण्यात आली व शांती नगर, पंचशील नगर परिसरात स्प्रे-फवारणी करण्‍यात आली तसेच डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्‍यात आली. प्रभाग क्र.९ एस.आर.पी.एफ. वडाळी येथील भारत नगर येथे धुवारणी व चांदुर रेल्वे रोड श्री.ठाकुर यांच्या घराजवळ व आजूबाजूच्या परिसरामध्ये फवारणी करण्यात आली.
विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. सिमा नैताम व सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्‍य झोन क्र. २ राजापेठ अंतर्गत प्रभाग क्र.१२ मध्ये साफ़ सफाई कंत्राटदार मार्फ़त रुख्मिणी नगर, शाम नगर परिसरात स्प्रे-फवारणी करण्‍यात आली तसेच एम. पी. डबल्यू., ए.एन.एम. व आशा वर्कर यांच्या सोबत प्रभागात डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्‍यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *