शेतकऱ्यांना नियमित वीज व मागील त्याला सौर पंप उपलब्ध करून द्या, दिनकर सुंदरकर यांची मागणी

अमरावती / प्रतिनिधी
गेल्या पंचवीस दिवसापासून पाऊस न आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके ही नुकसान ग्रस्त होत असून पाण्याअभावी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र वीज वितरण कंपनीची व्यवस्थापना बरोबर नसल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना वीज पुरवठा नियमित होत नाही अशा सर्व शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करा व मागील त्याला सौर पंप अनुदानावर उपलब्ध करून द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते युवा शेतकरी दिनकर सुंदरकर यांनी केली आहे.

वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज पुरवठा केल्या जातो मात्र नैसर्गिक संकट व तांत्रिक अडचणी यामुळे शेतकऱ्यांना नियमित वीज मिळत नाही तर शेतकरी विजेचा वापर केवळ तीन ते चार महिने करतो मात्र त्याला वीज बिल हे वर्षभराचा आकारण्यात येते ही वीज बिलाची पद्धत चुकीची असून रीडिंग नुसार शेतकऱ्यांना वीज बिल देण्यात यावे अशी मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली तर मागील त्याला सौर पंप शेतकऱ्यांना अनुदानावर सरकारने दिल्यास अनेक शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या समस्या निकाली निघतील असेही मत यावेळी सुंदरकर यांनी व्यक्त केले याप्रसंगी स्थानिक वीज वितरण कंपनीला वीज पुरवठा नियमित सुरू करण्यात यावा याकरिता शेतकऱ्यांनी निवेदन दिले याप्रसंगी शेतकरी दिनकर सुंदरकर, सिंधुताई डोईफोडे, धीरज गिरे, संतोष जवके, सुभाष राऊत, राजेंद्र कापडे सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *