युनेस्काे च्या एनजीओ फोरम इलेक्टाेरल बाेर्डच्या प्रमुखपदी प्रा. प्रणव चेंडके

श्री हव्याप्र मंडळाचा वाढला लाैकीक : मंडळाद्वारे सत्कार व जपान दौरा करीता शुभेच्छा

अमरावती दि.३० : भारतीय पारंपारीक खेळ, क्रीडा चा प्रचार-प्रसार करणारे, युनेस्काे सदस्य श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची ख्याती आज आंतरराष्ट्रीय स्तरावर विख्यात आहे. त्यामध्ये आता नव्याने भर पडली असून मंडळाचे युवा नेतृत्व व आतंरराष्ट्रीय समन्वयक प्रा. प्रणव चेंडके यांची युनेस्काे च्या आयसीएच एनजीओ फोरम इलेक्टाेरल बाेर्ड च्या प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. ही उपलब्धी मंडळाचा लौकिक वाढवणारी व समस्त अमरावतीकरांना गौरवान्वित करणारी ठरली आहे. या निमित्याने शुक्रवार दि.२९ सप्टें रोजी मंडळाच्या स्व. सोमेश्वर पुसतकर सभागृह येथे दु.४ वाजता प्रा. प्रणव चेंडके यांचा सत्कार करीत जपान दौऱ्याकरिता मंडळाच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना म्हणजेच युनेस्काेशी संलग्नित एनजीओ फोरमची कार्यकारीणीची बैठक नुकताच दि.२६ सप्टेंबर २०२३ राेजी पार पडली. या बैठकीमध्ये युरोप व लॅटिन अमेरिका विभागातील युनेस्को संलग्नित संस्थांची आयसीएच अंतर्गत एनजीओ फोरम मध्ये सदस्य निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निवड समितीच्या प्रमुख पदाकरिता एनजीओ फोरम च्या वतीने काॅल फॉर अ‍ॅप्लीकेशन प्रक्रीया राबविण्यात आली. ज्यामध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला युनेस्काे ची मान्यता असल्याने सदस्य स्वरूपात निवड समीतीद्वारे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कार्य आणि आतंराष्ट्रीय समन्वयक प्रा. प्रणव चेंडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयाेजीत विविध उपक्रमांचा आढावा घेत युवा नेतृत्व म्हणून प्रा. प्रणव चेंडके यांची एनजीओ फोरम इलेक्टाेरल बोर्डाच्या प्रमुखपदी एकमताने निवड करण्यात आली.

या निमित्याने आयोजित सत्कार व शुभेच्छापर कार्यक्रमाला मार्गदर्शक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य उपस्थित होते. मंडळाचे सचिव प्रा. रवींद्र खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाचे कार्यकारिणी सदस्य डॉ. किशोर फुले, माजी प्राचार्य प्रा. विकास कोळेश्वर, डॉ. अरुण खोडस्कर, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन चे प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजली राऊत, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते तसेच मंडळाच्या सर्व विभागाच्यावतीने प्रा. प्रणव चेंडके यांचा हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त करीत श्री हव्याप्र मंडळाला तसेच प्रा. प्रणव चेंडके यांना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दीप कान्हेगावकर यांनी केले. संचालन डॉ. विजय पांडे यांनी तर आभार डॉ. संजय तिरथकर यांनी मानले. सत्कार सोहळ्याला मंडळाचे सर्व पदाधिकारी, विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गातर्फे प्रा. प्रणव चेंडके यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

युनेस्काे च्या इतिहासात प्रथमच ‘युवा नेतृत्व’
जगातील सर्व देशांची संयुक्त संघटना युनेस्काे व्यापकस्तरावर कार्य करीत आहे. त्याकरीता विविध संघटना व संस्थांना एनजीओ फोरम इलेक्टाेरल बाेर्डचे सदस्य म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये अनेक ज्येष्ठ व तज्ञांचा समावेश असताे. आजवर हीच परंपरा सुरू हाेती, मात्र श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे आतंरराष्ट्रीय समन्वयक प्रा. प्रणव चेंडके यांची आयसीएच एनजीओ फोरम इलेक्टाेरल मंडळावर प्रमुखपदी निवड पंरपरेला सकारात्मक फाटा देणारी ठरली आहे. विशेष म्हणजे, युनेस्को च्या इतिहासामध्ये प्रथमच प्रा. प्रणव चेंडके सर्वात कमी वयाचे व युवा नेतृत्व म्हणून झालेली निवड श्री हव्याप्र मंडळ व समस्त अमरावतीकरांसाठी गाैरान्वीत करणारी बाब ठरली आहे.
…………………..
मंडळाचे कर्तृत्वाने दिले बळ
श्री हनुमान प्रसारक मंडळाच्या कर्तृत्वाचा वारसा, पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांची प्रेरणा आणि आई वडिलांसह मंडळातील पदाधिकारी यांच्या सहकार्यामुळे आज मंडळासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वीरीत्या कार्य करता येत आहे. मंडळाचा आंतरराष्ट्रीय समन्वयक म्हणून कार्य करतांना श्री हव्याप्र मंडळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर भक्कम अशी ओळख देत मंडळाचे कार्य जगातील प्रत्येकापर्यंत पोहचावे हे माझे ध्येय आहे. त्याकरिता पद्मश्रींचा ‘आज बढो ! सब से आज बढो… मंत्र सदैव बळ देत असल्याचे मत प्रा. प्रणव चेंडके यांनी सत्काराला उत्तर देतांना विनम्र मत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *