पोलीस कल्याणासाठी आपण सदैव तत्पर – आ.सौ. सुलभाताई खोडके

शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने निशुल्क आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात

अमरावती २१ ऑक्टोबर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस अधिकारी व कर्मचारी अनेक तपास , बंदोबस्त व कार्यवाही साठी तत्पर असल्याने त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते . म्ह्णूनच पोलिस कर्मचाऱ्यांच्या ताण-तणाव कमी व्हावा,निरोगी जीवनशैली व त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी आयोजित निशुल्क आरोग्य तपासणी व उपचार शिबीर कार्यक्रम प्रशंसनीय आहे. पोलीस कल्याणासाठी आपण सदैव तत्पर राहू , असा विश्वास आ. सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केला . शहीद पोलीस स्मृती दिना निमित्य शहर पोलीस आयुक्तालय अमरावतीच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन पोलीस कवायत मैदान येथे करण्यात आले. या प्रसंगी आ.सौ. सुलभाताई खोडके , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष , प्रवक्ता ,तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके , पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी , उपायुक्त विक्रम साळी , यश खोडके , सुरेश रतावा आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना आमदार महोदयांनी शहर पोलीस विभागाच्या गतिशील कामकाजाची प्रशंसा केली. अमरावती शहरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे , पोलीस वसाहतीचा प्रश्न तसेच वाढती लोकसंख्या लक्षात घेता काही भागात नवीन पोलीस स्टेशन स्थापन करण्याबाबत सुद्धा पाठपुरावा करण्यात येत असून नजीकच्या काळात पोलीस वेलफेअर साठी सुद्धा आपण कटिबद्ध असल्याचे मनोगत आमदार महोदयांनी व्यक्त केले . यावेळी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आमदार महोदयांसमवेत सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . तसेच आरोग्य शिबिरात सेवा देणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टर मंडळींचा सुद्धा आ. सौ . सुलभाताई खोडके यांच्या हस्ते सन्मान चिन्ह बहाल करून सत्कार करण्यात आला.

या शिबिरामध्ये बी. पी. ,शुगर ,श्वसन रोग , ईसीजी , हृदयरोग , स्त्रीरोग ,बाल रोग , मेंदू रोग , किडनी रोग , कान,नाक, घसा , दंत चिकित्सा , अस्थिरोग मानसोपचार व समुपदेशन , व्यसन मुक्ती आदी संदर्भात तपासणी , वैद्यकीय सल्ला व औषधोपचार करण्यात आले. शिबिराला जिल्हा सामान्य रुग्णालय , सुपर स्पेशालिटी रुग्णालय , झेनिथ हॉस्पिटल , रेडियन्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल , अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल , पीडीएमसी रुणालय , डेंटल हॉस्पिटल , सुयश हॉस्पिटल , रिम्स हॉस्पिटल , सुजान सर्जिकल कँसर हॉस्पिटल पारश्री हॉस्पिटल बनकर आर्थोपेडिक हॉस्पिटल यासह शहरातील विविध नामांकित हॉस्पिटल च्या तज्ञ डॉक्टर व टीम ने वैद्यकीय सेवा दिली. या आरोग्य तपासणी शिबिराचा अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अधिनस्त सर्व दहाही ठाण्याचे पोलीस अधिकारी , कर्मचारी तसेच पोलीस कुटुंब यांनी लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *