AKOLA । मूर्तिजापूर । देवरन हिंदू स्मशाभूमीचा होतोय कायापालट !

सुमित सोनोने बातमीपत्र, मुर्तिजापूर

शहरातील जुनी वस्ती परिसरातील असलेल्या प्रभाग क्रमांक दोनमधील देवरन हिंदू स्मशाभूमीचे विकास कार्य झपाट्याने होत असून तिचा कायापालट होत आहे.

मुर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरिष पिंपळे यांच्या माध्यमातून हिंदू स्मशानभूमीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी विकास कामाकरीता उपलब्ध करून देण्यात आला आहे.या ठिकाणी वृक्षारोपण व त्यांचे संगोपन करणे,दररोज स्वच्छता ठेवणे याकरिता राहुल गुल्हाने नेहमी पुढाकार घेऊन स्मशानभूमीला दररोज भेट देऊन स्वच्छतेसंदर्भात पाहणी करतात.तसेच या ठिकाणी चौकीदार म्हणून असलेले रवी पवार यांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून यासाठी या भागात एक एक्करमध्ये झेंडूची व इतर अनेक प्रकारच्या फुलांची पेरणी करण्यात आली आहे.याच माध्यमातून रवी पवार यांना रोजगरसुद्धा उपलब्ध झाला आहे.स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड त्याचबरोबर फळ देणारी झाडे लावण्यात आली आहेत.स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण पाहून नागरिकांनी आमदार हरिष पिंपळे यांचे कौतुक केले आहे.भाजपा नगरसेविका कविता राहुल गुल्हाने व राहुल गुल्हाने भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष हर्षल साबळे,कोमल तायडे,अमोल प्रजापती,अभिजित डहाळे,अविनाश यावले व इतर अनेक भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन वेळप्रसंगी स्वच्छता व नियोजन संदर्भात स्मशानभूमीची पाहणी करतात.आवश्यक असलेली वस्तू या ठिकाणी आणून स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरण करण्यात सहभाग घेतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *