करिअरच्या वाटचालीत बुद्धिमत्ता जेव्हढी महत्वाची त्याहीपेक्षा कौशल्ये आणि इच्छाशक्ती-आमदार सौ. सुलभाताई खोडके

  • श्री हिंगलाज मातेची आमदार -सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते महाआरती
  • श्री हिंगलाज माता नवरात्रोत्सव २०२३ यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा थाटात
  • दिवंगत भावसार समाज सेवकांच्या स्मरणार्थ यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व शिक्षक सन्मान समारंभ
  • देवीचा गोंधळ, दांडिया, नऊवारी, ट्रॅडिशनल फॅशन लूक विथ ज्वेलरी, रॅम्प वॉक, फॅशन शो, वन-मिनिट शो, उखाणे स्पर्धा, श्लोक स्पर्धा ठरले मुख्य आकर्षण

स्पर्धेच्या युगात करिअर निवडताना भविष्यकालीन संधीचा विचार करून निवडावे. नवतंत्रज्ञानामुळे नेहमीच्या पाऊलवाटांशीवाय करिअरचे नवीन मार्ग विद्यार्थ्यांनी चोखंदळावे. करिअर निवडताना आवड, क्षमता, पात्रता यांचा प्रामुख्याने विचार व्हावा.विविध क्षेत्राची माहिती घेऊन त्यावर विद्यार्थी आणि पालक यांनी सकारात्मक चर्चा करून करिअरची निवड करावी. इयत्ता दहावी व बारावीतील यशानंतर थांबू नका. तसेच जर सध्या गुणांच्या बाबतीत अपयश आले असले तरीही यापुढे सातत्याने प्रयत्न केल्यास निश्चितच यश मिळेल. करिअरच्या वाटचालीत बुद्धिमत्ता जेवढी महत्वाची आहे, त्याहीपेक्षा कौशल्ये आणि इच्छाशक्ती महत्वाची आहे. यापुढील काळातील संधीसाठी संशोधन, उद्योजकता हे क्षेत्रही विचारात घ्यावे लागेल. दिवंगत भावसार समाज सेवकांच्या स्मरणार्थ यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व शिक्षक सन्मान समारंभाचे आयोजन येथे करण्यात आले आहे. हा एक स्तुत्य व अभिनंन्दनिय उपक्रम आहे. शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेऊन शैक्षणिक सत्र २०२२-२०२३ मध्ये प्राविण्यप्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत आपण त्यांच्या भविष्यातील वाटचालीकरिता शुभेच्छा देत आहोत. यासोबतच शिक्षण निधी उपलब्ध करून देत या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविणाऱ्या व त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आगामी काळात नवीन पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत जिल्हा भावसार क्षत्रिय समाज अमरावती बांधवांच्या वतीने नवरात्रोत्सवा निमित्ताने आयोजित या कल्याणकारी उपक्रमास याप्रसंगी सर्व मान्यवरांचे अभिनंदन करीत आपण शुभेच्छा देत आहोत. असे प्रतिपादन आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी दिवंगत भावसार समाज सेवकांच्या स्मरणार्थ रविवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व शिक्षक सन्मान समारंभ प्रसंगी उपस्थितांना संबोधून केले.

अमरावती जिल्हा भावसार क्षत्रिय समाज, अमरावती च्या वतीने साबनपुरा स्थित इंद्रभुवन थिएटर परिसरात आयोजित यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी श्री सुभाष भाऊ गोजे, भावसार क्षत्रिय समाज पंचकमिटी नागपूर अध्यक्ष तथा अध्यक्ष विधी व न्याय विभाग, ए. आय. बी. के. महासभा ( भारत) तसेच जेसीआय इंडियाचे राष्ट्रीय प्रशिक्षक-डॉ. सौ रश्मी ऋषिकेश नागलकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा भावसार क्षत्रिय समाज,अमरावती अध्यक्ष-राजाभाऊ दखणे, उपाध्यक्ष -पंकज कळमकर सचिव -विजय अंबारे, कोषाध्यक्ष-महेश जोगी, महिला कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष-डॉ. स्वाती टोंगळे, सचिव-जया मानमोडे, युवा परिषदेचे अध्यक्ष-सचिन येळणे, सचिव-शुभांगी येळणे, आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते श्री हिंगलाज माता नवरात्रोत्सवा निमित्ताने श्री हिंगलाज मातेची आरती करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा भावसार क्षत्रिय समाजाच्या कार्यकारिणीचे वतीने आमदार-सौ. सुलभाताई खोडके यांचा शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अतिथींच्या हस्ते वर्ग १ ते ९ तसेच पदवीधर व उच्च पदवीधर यासोबतच इयत्ता दहावी व बारावी तसेच शिष्यवृत्तीनिधी प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यासह त्यांचा यथोचित गुणगौरव करण्यात आला.

याप्रसंगी अशोकराव किडीले, दिपकराव फुलझेले, रमेशराव ढगे, यशवंतराव आंबेकर, गुणवंतराव जोगी, डाॅ.विजयराव नघाटे, प्रशांतजी येळणे, श्रीवल्लभराव पेठकर, श्रीकांतराव पेठकर, भास्करराव पेठकर, राजेश जोगी, नंदकिशोर पेठकर, अनिलजी मुधोळकर, राजू टोंगळे, संदीप फुलझेले, डॉ. ऋषिकेशजी नागलकर, धीरज पोहणेकर, शुभम हजारे, किशोर पोहोणेकर, प्रेमचंद पंडित, अनिल पंडित ,राजेंद्र पवार, कुलदीप पेठकर, गणेश बोडखे, मुल, सुभाषराव साधनकर, नागपूर, वृषभ सुताने, शैलेशराव सुताणे, सौ. जयाताई मानमोडे, शुभांगी येळणे ,अर्चनाताई दखणे, प्रदीपराव दखणे, कल्पनाताई अंबारे, अनिताताई जोगी, सारिकाताई अंबारे, अर्चनाताई महाजन, वैशालीताई सुताने, संगीताताई सुताणे डॉ. रश्मीताई नागलकर, दत्तात्रय पेठकर,नचिकेत पेठकर, सचिन येळणे, आदींसह जिल्हा भावसार क्षत्रिय समाज, अमरावती चे सर्व सदस्य व पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-शुभांगी येळणे यांनी तर आभार प्रदर्शन- सचिन येळणे यांनी केले. कार्यक्रमाअंती सर्व उपस्थितांचे राजाभाऊ दखणे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *