Amravati | मणीपूर ले-आउट व पाठ्यपुस्तक परिसरातील नागरिकांनी सतर्कता व दक्षता बाळगावी – आ.सौ. सुलभाताई खोडके

  • बिबटयाला जेरबंद करण्यासाठी उपाय योजना राबविण्याची वन विभागाला सूचना
  • बिबट्याला अटकाव घालण्यासाठी मणिपूर लेआऊट भागात ड्रोन कॅमेराचा वॉच

अमरावती २५ऑक्टोबर : स्थानिक व्हीएमव्हीलगतच्या पाठ्यपुस्तक मंडळ परिसरातील रहिवाशी भागात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. गेल्या एका महिन्यापासून पाठ्यपुस्तक मंडळ परिसर ते व्हीएमव्हीला लागून असलेल्या वनक्षेत्रात बिबट्याने आपला मुक्त संचार चालविला असून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने परिसरात शोध व बचाव मोहीम सुरु केली मात्र बिबट्याला जेरबंद करण्यात अद्यापही यश न आल्याने स्थानिक भागात बिबट्याची दहशत कायम आहे. बुधवारी बिबट्याने मणिपूर लेआऊट भागात शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी वन परिक्षेत्रीय अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधून बिबट्याला आवर घालण्यासाठी रेस्क्यू पथक तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक व सर्व सुरक्षात्कामक उपाययोजना करण्याची सूचना केली. तसेच पाठ्यपुस्तक परिसर व मणीपूर ले-आउट भागातील नागरिकांनी सतर्कता व दक्षता बाळगावी असे आवाहन आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केले आहे.

शहराच्या पूर्वेकडील सीमाभागातील एसआरपीएफ कॅम्प, विद्यापीठ वनक्षेत्र तसेच एक्सप्रेस हायवे परिसरात बिबट्याने संचार केल्याचे अनेकदा दिसून आले . मात्र आता बिबट्याने चक्क अमरावती शहराच्या रहिवाशी भागात शिरकाव केल्याने स्थानिक नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. व्हीएमव्ही लगतच्या पाठ्यपुस्तक मंडळ परिसरातील जंगल भागात बिबट्या तळ ठोकून बसला असून स्थानिक भागात अनेकांना बिबट्या संचार करतांना दिसून आला . बिबट्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये सुद्धा कैद झाल्या असल्याने सदर भागात बिबट्याची भीती व दहशत निर्माण झाली आहे. स्थानिक परिसरातील नागरिकांच्या जीवितास कुठलाही धोका उद्भवू नये म्ह्णून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तत्काळ सुरक्षात्मक उपायोजनां बाबत आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांचा वन विभागाकडे सारखा संवाद व संपर्क सुरु असल्याने आता रेस्क्यू पथक व आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पथकाची शोध मोहीम सुरु असतांना आता बिबट्याने सैरावैरा होऊन लगतच्या मणीपूर ले -आऊट परिसरात संचार केला आहे. बुधवारी दिवसभर बिबट्याने सदर भागात धुमाकूळ घातला असल्याने एकच धावपळ उडाली . सदर भागाला लागून शोभा नगर व सरस्वती नगर असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे वन विभागाने बिबटयाला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू पथक सज्ज ठेवा, सदर परीक्षेत्रात ड्रोन कॅमेच्या साहाय्याने बिबट्याचा शोध घेण्यात यावा, अशा सूचना आमदार महोदयांनी वन विभागाला दिल्याने सर्व बचाव यंत्रणा घटनास्थळी तैनात झाली आहे. बिबट्याला अटकाव घालण्यासाठी वन विभागाचे रेस्क्यू पथक तैनात असून युद्धपातळीवर शोध मोहीम सुरु आहे. लवकरच बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश येईल , त्यामुळे नागरिकांनी सतर्कता व दक्षता बा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *