अमरावतीत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन, 40 ते 55 व 55 ते 75 वयोगटापर्यंत घेण्यात आली स्पर्धा

प्रतिनिधी अमरावती । महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ. मनोज निलपवार यांच्या प्रेरनेणे रविवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र योग शिक्षक संघ, अमरावती जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोशियशन आणि ब्रिजलाल बियाणी सायन्स कॉलेज यांच्या सयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा – 2023 चे आयोजन बियाणी कॉलेज ऑडिटरीयम हॉल अमरावती येथे करण्यात आले होते. दीप प्रज्वलन व पतंजली ऋषींच्या प्रतिमेचे पूजन करून योग स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले,

यावेळी महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे अमरावती विभाग प्रमुख चंद्रकांत अवचार, अकोला जिल्हा अध्यक्ष सुभाष तायडे, अकोला जिल्हा उपाध्यक्ष प्रा.डॉ. नानासाहेब सपकाळ, नरेंद्र मुळे, अमरावती जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोशियशनचे समन्वयक विशाल खोडस्कर, अमरावती जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र गवळी, उपाध्यक्ष अरविंद मेहरे, सचिव – दादारावजी नेवारे, राजेंद्र पचगाडे आदी उपस्थित होते,

सदर स्पर्धा ही 40 ते 55 वयोगट व 55 ते 75 वयोगटापर्यंत घेण्यात आली, प्रत्येक महिला पुरुष स्पर्धकांनी आसनाची सुंदर प्रस्तुती दिली. यानंतर महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे राज्य सचिव योगगुरु मनिष देशमुख आणि समाजसेवक नितीन कदम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं ज्यात स्पर्धकांना पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये 55 वर्षीवरील पुरुषांमध्ये प्रथम क्रमांक डॉ. विकास रहाणे दुसरा क्रमांक डॉ. संजय वानखडे तर तिसरा क्रमांक राजपूत सरांनी पटकवीला. महिलांमध्ये प्रथम क्रमांक कुसुम चोधरी, दुसरा क्रमांक वृषाली तायडे, व तिसरा क्रमांक वाघमारे ताई, राजपूत ताईंनी पटकविला. तर 40 वर्षावरील वायोगताट प्रथम क्रमांक काळे सरांनी दुसरा क्रमांक जयस्वाल मॅडम व वैशाली केणे आणि तिसरा क्रमांक बबिता दीक्षित यांनी पटकवीला. पंच म्हणून विशाल खोडस्कर, भाग्यश्री कानडे, प्रा. स्वप्नील मोरे, विकास रहाणे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *